Saturday 16 January 2016

नभ उतरू आलं

आपल्या लहानपणीच आपली ओळख पावसाशी होते;चिऊ अन काऊच्या गोष्टीमधून. जोराचा पाऊस येतो अनकावळ्याचे शेणाचे घरटे वाहून जाते तर चिऊ ताईचेमेणाचे घर मात्र तग धरून राहते.

आपण जरा मोठे होतो व शाळेचे लचांड आपल्या पाठीलागते. अभ्यास, बाईंचा ओरडा या सर्वांचे पिशाच्चआपल्या मानगुटीवर बसते. हे पिशाच्च काही काळापुरतेतरी मानगुटीवरून उठावे म्हणून आपण सर्वांनीचलहानपणी आर्जव केलेले असते, ‘सांग सांगभोलानाथ, पाऊस पडेल का? शाळेभोवती तळेसाचून सुट्टी मिळेल का?’ आणी खरोखरच आपलीविनवणी ऐकून पाऊस आला की आपला हट्ट सुरुव्हायचा,' ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे'

विद्यार्थी दशेतून तारुण्यामध्ये प्रवेश करताना प्रेयसीच्याआधी आपला सखा होतो तो हाच पाऊस. 'जिंदगी भरनहीं भूलेंगे वो बरसात की रात, एक अनजानहसीनासे मुलाकात की रात' किंवा 'एक लडकी भिगीभागीसी' अशा गाण्यांमुळे आपल्यालाही धुंद पावसाळीसंध्याकाळी आपली मधुबाला मिळावी अशी सुप्तमनीषा जागी होते. आपला सखा झालेला पाऊस कधी तरी अवचित बरसावा व आपल्या प्रेयसीला त्याने आपल्या प्रेमात न्हाऊ घालावे अशी वेडी आशा कित्येकजण मनात बाळगून असतात

खूप प्रयत्नांती आपण आपली मधुबाला मिळवतोच.तिला 'प्यार हुआ इकरार हुआ है’ असे सांगतानापाऊस पण आपल्यासोबत असेल तर कित्ती बरे होईलअसे वाटते. मुसळधार पावसात एकाच छत्रीमध्येप्रेयसीला घेऊन फिरण्यात काय थ्रिल असते ते राज वनर्गिस ने आधीच पडद्यावर दाखविले असल्याने आपणमुद्दामुनच छत्री विसरलेलो असतो. प्रेयसीचा तो ओलेता स्पर्श पावसाळी वातावरणाला अजूनच नशीला करून जातो. आणी त्यात जर विजेचा लपंडाव सुरु झाला व प्रेयसी 'बादल यु गरजता है, डर कुछ ऐसा लगता है ' असे म्हणत आपल्याला घाबरून बिलगली की मिळणारा स्वर्ग सुखाचा आनंद पावसाच्या धारांना अमृत धाराच बनवून टाकतो.

प्रियकर व प्रेयसी दोघांनाही एकमेकांचा सहवास अनंत काळासाठी हवाच असतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी दोघेही पावसाचीच मदत घेतात. आपल्याला जरा वेळच व ते देखील चोरून भेटायला आलेल्या प्रेयसीला थांबविण्यासाठी प्रियकर थेट बरखा राणी ला आर्जव करतो, 'बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा दिलबर जा ना पाए, झूमकर बरसो'. आणी जर अनेक दिवसांच्या विरहानंतर प्रियकर भेटला असेल तर प्रेयसीला देखील सेम फिलिंग वाटत असते. 'बरस बरस रे मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम' असे सांगणारी ती, पुढे जाऊन हे ही म्हणते की, 'बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात'

प्रेयसी व प्रियकर दोघांसाठी प्रत्येक ऋतू हा प्रेम ऋतुच असतो पण झिम्माड पावसाची नशाच काही और असते. आपल्या बोलाविण्याखातर काळ वेळ न पाहता धावत येणाऱ्या प्रेयसीचे अप्रूप प्रियकराला नसले तरच नवल. म्हणूनच त्याच्या तोंडी नकळत येते, 'भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची'

पावसामध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये विसावताना खट्याळ प्रियकर आपल्या प्रेयसीला जेव्हा विचारतो,'भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में ऐसी बरसातों में, कैसा लगता है?' तेव्हा प्रेयसीचे उत्तर असते, 'ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदन को भीगो के मुझे छेड़ रहे हो'

पाऊस हा दोघांमध्ये तिसरा असून देखील कबाब में हड्डी वाटत नाही ते याच कारणांमुळे.

पावसाची गम्मत असते नाही! बाहेरून तो अंग प्रत्यांग ओलेचिंब करत असतो पण प्रियकर - प्रेयसीच्या अंतरंगात मात्र मदनज्वर भडकावीत असतो. आणि हा ज्वर चढला की जगाची बंधने झुगारत मन बंड करून उठते व खुशाल गाऊ लागते,'आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ'.बादल से छम-छम शराब बरसे, सांवरी घटा से शबाब बरसे अशी काहीशी अवस्था झाल्याने प्रेयसीचा पदर देखील ढळलेला असतो अगदी 'नमक हलाल' मधील स्मित पाटील सारखा.

पण काही प्रेयसी मात्र शालीनतेचा पदर ओढून प्रियकराला आडूनच सुचवू पाहतात.. 'ओ सजना, बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अँखियों में प्यार लाई'. जेव्हा ती सुचविते  हे राजसा, आता मला जास्त दूर ठेवू नकोस. आणी तिच्या या आर्जवाला प्रतिसाद देऊन प्रियकर तिथे पोहचला व त्याच वेळी जर प्रेयसीच्या केसांमधून पाऊस ओघळत असेल तर प्रियकर नकळत गुणगुणतो , 'न झटको झुल्फ से पानी, ये मोती फूट जायेंगे, तुम्हारा कुछ न बिगड़ेगा, मगर दिल टूट जायेंगे'. जणू प्रियकराला हेच सुचवायचे असते की प्रिये, तुझे ओलेते दर्शन मला डोळे भरून साठवून दे

प्रेयसी व प्रियकराला जसे 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ' असे गायला आवडते, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिकच 'पावसात एकमेकांच्या हातात हात घालून 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन' असे म्हणत वरळी सीफेस किंवा मरीन ड्राइव्ह ला फेरफटका मारायला आवडते. आपल्या पैकी अनेक प्रेमवीरांना हे पटले असेलच

प्रियकर व प्रेयसी एकदाचे नवरा बायको होऊन 'नांदा सौख्यभरे' या उक्तीप्रमाणे दाम्पत्य जीवन एन्जोय करू लागतात. अशावेळी अनुभव चित्रपटातील तनुजा व संजीव कुमार प्रमाणे खिडकीतील पावसाला साक्षी ठेवत हे नवरा बायकोचे जोडपे परस्परांवरील विश्वास व प्रेम अजून दृढ करतात.' मेरी जान; मुझे जान ना कहो' असे म्हणत लडीवाळपणे बायको जेव्हा नवऱ्याच्या मिठीत विसावते तेव्हा पावसाचे डोळे पण अजून झरू लागतात

पाऊस जसा आनंदी क्षणांचा सोबती असतो तसा दुःखद स्मृतींचा देखील.'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या गाण्यात आपल्या आईचे कायमचे दुरावणे त्या पावसाच्या साक्षीने नायक अनुभवतो. आपल्या रडण्याला 'घनव्याकूळ ' असे विशेषण लावून तो उदास दुःखी नायक जणू पावसाला हि आपली बोच बोलून दाखवितो.

तर इजाजत मधील नायिका 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ' या गाण्यात प्रियकराला सांगते, पावसाच्या साक्षीने तू व मी अनुभवलेल्या ओलेत्या रात्री, ज्या अजून ही तुझ्या बिछान्यात विसावलेल्या आहेत त्या मला परत कर. .'सावन के कुछ भिगे भिगे दिन' त्या राहिलेल्या सामानात आहेत त्या परत कर, 'एक अकेले छत्री में जब जब आधे आधे भिग रहे थे' त्याच्याशी निगडीत सर्व स्मृती, आनंद ज्या काही गोष्टी आहेत त्या परत कर. थोडक्यात काय तर विभक्त होण्याचे दुःख अनुभवताना देखील प्रेयसीला आठवतात ते पावसाळी दिवसच

पाऊस हा अगदी आपल्या सर्व लहान सहान सुख दुःखात नकळत पणे झिरपलेला असतो. पावसात मनसोक्त भिजलेले प्रियकर व प्रेयसी जेव्हा कालांतराने आजी आजोबा होतात तेव्हा देखील आपल्या नातवंडाला खेळविताना त्यांना आठवतो तो पाऊसच.'येरे येरे पावसा तुला देतो पैसा ' हेच गाणे ते आपल्या पुढच्या पिढीला अगदी नकळत पणे शिकवितात कारण सत्य हेच आहे की माणूस पावसाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत नाही तर पाऊसच सर्व मनुष्यजातीला त्याच्या तालावर खेळवत असतो

- प्रशांत दांडेकर            

       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

No comments:

Post a Comment