🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
✒कथा लेखन विशेष✒
👉🏾 शीर्षक : साक्षात्कार
👉🏾 लेखक : सुचिकांत
ही गोष्ट २ मित्रांची आहे, प्रशांत आणि सागर. दोघांचं शिक्षण एकाच मराठी शाळेतून झालं, आणि दैवयोगाने दोघा मित्रांना एकाच ठिकाणी नोकरी लागली. दोघांची लग्न झाली, त्यांना मुलंबाळ झाली.. काही दिवसांपासून सागरचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. सतत अंगावर खेकसायचा!
प्रशांत ने सागरच्या चिडक्या स्वभावाचं कारण हेरलं होत! आपल्या मित्राला योग्य मार्ग दाखवायचा हे प्रशांतने ठरवलं! त्याने सागरला एक दिवस आपल्या घरी चहासाठी निमंत्रित केलं. ठरल्याप्रमाणे सागर प्रशांतच्या घरी गेला. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या, प्रशांतच्या मुलांनी रेखाटलेली भिंतीवरची चित्र पाहून, सागरला खूप कौतुक वाटलं. तिथच टेबलवर, मुलांनी मिळवलेली सर्व बक्षिसं मांडलेली होती. ते पाहून तर सागर खूपच प्रभावित झाला. चहा पिता पिता, त्याने सहज प्रशांत जवळ मुलांची चौकशी केली, तेव्हा समजलं कि मुलं शाळेतून आल्याआल्या खेळायला म्हणून बाहेर गेलीत ती अजून आलीच नाहीत. एका मागोमाग एक सागरला अनेक धक्के बसत होते, कारण सागरच्या घरात याच्या विरुद्ध वातावरण असायचं. मुलं सतत अभ्यासात असायची. केवळ अभ्यास एके अभ्यासच चालू असायचा, मुलांना मोकळा वेळ खूप कमी मिळायचा..
प्रशांत, सागरला घर दाखवू लागला. घरात मुलांची वेगळी खोली होती, जिथे उत्कृष्ट संगणक, Tablet, लहानसा LED TV, मुलांची खेळणी, क्रिकेटचे कीट अशा कितीतरी गोष्टी होत्या! ज्या सागर आपल्या मुलांसाठी घेऊ शकत नव्हता. त्याने दबकतच प्रशांतला विचारलं, “प्रशांत, तू कस काय हा खर्च उचलू शकलास?” तो पर्यंत प्रशांतला आपल्या मित्राची मानसिक घालमेल समजली होती ... प्रशांत ने त्याला शांतपणे समजवायला सुरुवात केली!!!
"तुला आठवतं का, काही वर्षांपूर्वी, आपला मुलांच्या शाळेसाठी कोणते माध्यम निवडावे यावरून वाद झाला होता? तू तेव्हा मराठी शाळेत मुलांना शिकवण्याच्या विरोधात होतास, मराठी शाळांमध्ये ही सुविधा नाही ती सुविधा नाही म्हणून हिणवत होतास! आणि मी मराठी शाळांचे समर्थन करत होतो!" सागरने दबक्या आवाजात हो! असे उत्तर दिले. प्रशांत पुढे म्हणाला, मराठी शाळांना काही क्षुल्लक कारणांवरून हिणवण्यापेक्षा मी त्यावर काम केलं! योजना आखली! अर्थात त्यात माझा देखील स्वार्थ होताच! माझे आणि माझ्या सारख्या अनेक पालकांचे, लाखो रुपये वाचणार होते!
"मी माझ्या सारख्याच अन्य पालकांना बरोबर घेऊन आपल्याच मराठी शाळेला नवसंजीवनी दिली. आम्ही सर्वांनी मिळून काही लाख रुपये जमा केले आणि शाळेची रंग रंगोटी, व शाळेला इतर सर्व सुविधा मिळवून दिल्या. दर्जेदार शिक्षक तर तिथे अगोदरच होते, परंतु आमचा हुरूप व उत्साह पाहून ते देखील अजून चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवू लागले! दुसऱ्या एखाद्या शाळेला वर्षातुन जेवढी फी दिली असती त्याच्या केवळ काहीच टक्के फी आम्ही फक्त काही पालकांनी 'स्वेच्छेने' आपल्या मराठी शाळेला दिली आणि आता माझी मुलं, मी जिथून शिकलोय त्याच परंतु डिजिटल आणि सर्व भौतिक सुविधांनी युक्त, ज्ञानरचनावादी मराठी शाळेत शिकतात.
फीचे एवढे पैसे वाचल्याने, मी वाचलेल्या पैशात मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी करू शकलो ज्या तू मुलांच्या खोलीत पाहिल्याच आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण, त्यामुळे अभ्यासाचा ताण कमी असल्यानं माझी मुलं आनंदी असतात, ती इतर कला गुणांना पुरेसा वेळ देऊ शकतात, छानपणे स्वतःचे विचार मांडू शकतात, व्यक्त होऊ शकतात! मी त्यांच्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक साहित्य देखील घेतले आहे, तसेच इंग्रजी वर्तमानपत्र आणि लहान मुलांची मासिकंसुद्धा चालू केल्याने ती दोघे खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी लिहू-वाचू लागलीत."
हे सर्व ऐकून सागरला खूप आश्चर्य वाटलं, आणि कुठे तरी आपण चुकलो आहोत याची त्याला मनोमन जाणीव होऊ लागली. मग त्याने हळूच विचारलं, “जे लोक सांगतात एस.एस.सी. बोर्डाचा अभ्यासक्रम पुरेसा नाही वगैरे, यात किती तथ्य आहे?” यावर प्रशांत ने हसून उत्तर दिलं, "अरे थापा मारत असतात लोक! अज्ञानी असतात ! एस.एस.सी. आणि सर्वच भारतीय बोर्डांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो.."
सागरनं पुन्हा विचारलं, “इंग्रजी जमेल का त्यांना?” यावर मात्र प्रशांत थोडा रागावलाच! प्रशांतनं त्याला सांगितलं कि हे बघ, तू पुन्हा जुने मुद्दे परत परत मांडू नकोस! कोणतीही इतर भाषा येण्यासाठी प्रथम मातृभाषा चांगली अवगत असणे महत्वाचे आहे. पाया पक्का असल्याशिवाय, इमारत कशी उभी रहाणार? आणि आपली मातृभाषा मराठी पक्की होण्यासाठी मराठी शाळा हा उत्कृष्ट पर्याय आहे, नाही का? आज मोठमोठ्या व्यावसायिकांपासून, कंपन्यांच्या मोठमोठ्या अधिकारी पदावर मराठी माध्यमात शिकलेली मुलं आहेतच ना? ते काय उगीच? त्यांना इंग्रजी कुणी शिकवलं? आज मराठी माध्यमातून शिकलेली जी मुलं, परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांनादेखील तिथली भाषा आत्मसात होतेच! कारण, त्यांचं मातृभाषेवरील प्रभुत्व!
सागरला रात्रभर झोप लागेना! घरी जाताना दिसणारी खेळण्याची दुकानं त्याला पुन्हा खुणवायला लागली, खूप दिवसांपासून त्याच्याही मनात मुलांसाठी एक उत्कृष्ट Laptop घ्यायचा विचार चालू होता, पण .... बहुधा त्याचमुळे त्याची चिडचिड होत होती ..... असो!
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत मुलांना सोडायला शाळेत गेलेला असताना, त्याने सागरला मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून बाहेर पडताना पाहिलं प्रशांतने औत्सुक्याने मुख्याध्यापकांना सागर बद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की, सागर ने त्याच्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मराठी माध्यम निवडलेलं आहे. त्यांच्याच प्रवेशाची चौकशी करायला सागर शाळेत आला होता, आणि हे ऐकताच, प्रशांतला खूप आनंद झाला, मनोमन त्याने माय मराठीचे खूप खूप आभार मानले..
||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:
Post a Comment