Monday 4 January 2016

तुकाराम गाथा

#सोमवार,
मार्गशीर्ष कृष्ण ||१०|| शिवसंवत-३४२.
#राष्ट्रीय_कालगणना-
भारतीय सौर दिनांक-१४ पौष,शके-१९३७
#दि.०४ जानेवारी,२०१६.

अध्याय पहिला--       
      १४७
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥
भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥

       ________#श्रीतुकाराम_बोल्होबा_आंबिले

~~दररोज टेकवू माथा....!!
.....हररोज विचारांची "तुकाराम-गाथा"!!



अर्थ :-  

आपापले काम आटोपून सर्व गोपाळ एका ठिकाणी जमले. आता जेवणाची वेळ झाली. आपल्या शिदोर्या आणा ।।१।।

सर्वांनी आपापल्या पापपुण्याचा हिशोब त्याच्याजवळ दिला इंद्रियरूपि गाईना अंत:करणरूपि गोठ्यात बसविले. हरिच्या सोबत दोंदिल, बोबङा, वाकड्या, पेंद्द्या, वड़ज्या या नावाचे गोपाळ होते ।।ध्रु।।

आपल्या आवडिप्रमाने त्यांनी पंगतित मुद्रा बांधल्या. हरिने आपली आवडती शिदोरि खोलुन त्यात स्वत:ची गोड़ी मिळवली  ।।२।।

पाप-पुण्यात्मक शिदोरिचा भार त्यांनी शुद्ध भावभक्तिसमुदायाचा योग आला नव्हता तो पर्यन्त आपल्या माथि वागविला. परमार्थ लक्षणाचा योग सगळ्यांच्या ठिकाणी आला पाहुन श्रीहरींनी सर्वांच्या पाप-पुण्याची शिदोर्यांची ओझि उतरविलि ।।३।।

जो घाइने, उताविलापनाने मागतो, त्याच्यावर बाकीचे सवंगडी रागवतत व् त्याला म्हणतात, मला मिळेल की नाही'? अशी खोटी भावना मनात का ठेवतोस ? ।।४।।

त्यांचा एकमेकांशी जो संवाद झाला, त्याने ते गोपाळ ब्रम्हनंदात तृप्त झाले. तुकोबा म्हणतात, ते गोपाळ म्हणू लागले, या रे या, आपण सारेजण श्रीहरिच्या चरणांना वंदन करुया ।।५।।


                सतत नियमित साडे बारा वर्षे सुरु राहणारा फेसबुक वरील एक 'अनोखा-अभंग-अखंड-साडे बारा वर्षे-श्री तुकाराम गाथा प्रसार-आध्यात्मिक उपक्रम'.

श्री तुकारामगाथा-एकूण ओवी संख्या=४५८३
४५८३/३६५=१२|| वर्षे

'एक तरी ओवी अनुभवावी।।'
            यानुसार 'एक तरी ओवी अनुभवण्यास द्यावी' या उदात्त हेतूने प्रस्तुत उपक्रम कर्त्याने हा उपक्रम आषाढी एकादशी(जुलै,२०१५) पासून हाती घेतला आहे. ओवीच्या क्रमांकावरून आपल्याला उपक्रमाचा कितवा दिवस हे लक्षात येईल.

                        तर अनुभवू या,वाचू या अन आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.माऊली निश्चित्तच सर्वांना साथ देईल.

ता.क.-वाचू या,सांगू या आणि आचरणात आणून प्रसार करु या...!!

#सोशल_मीडिया विधायक बनवूया...!
या मध्ये उपक्रम कर्त्याचा कोणताही #स्व-अर्थ नाही.


       _______श्री विशाल आनंदराव हारगुले.

No comments:

Post a Comment