Saturday 16 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग १२

 🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 12 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
             मेनका

🎶 एकूण मात्रा : 19

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2
= 19

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


पावलांना बोलती ज्याच्या झरे
तोच जातो टाकुनी मागे घरे

चालताना गात जातो चालणे
रान होउन गाय हिरवी हंबरे

एकटा काळ्या कड्यांच्या संगती
काळजाला तारकांची झुंबरे

सर्व काट्यांची लिपी होती तरी
रेखिली कोणी फुलांची अक्षरे

का निघाला ? चालला आहे कुठे ?
उत्तरांचे झेल घेती पाखरे
     (मंगेश पाडगावकर)


माणसांना माणसे कंटाळती
चेहर्‍यांना चेहरे हे टाळती

झाडल्या गोळ्या तुझ्या छातीवरी
ते तुझी आता जयंती पाळती

आणला नाही कुणी येथे दिवा
मात्र आता झोपड्या या जाळती

पाखरांचे पार गाणे गोठले
सूर हे नाण्यांस येथे भाळती

रोपही ज्यांनी कधी ना लावले
साप ते झाडांस या वेटाळती

ईश्वराला गाडला खड्ड्यामधे
आणि आता देवळे सांभाळती
       (मंगेश पाडगावकर)


वासनांचा आंधळा अंधार हा
भावनांचा बेगडी बाजार हा

आठवांनी का इथे झुरशी उगा
जीव घेई प्रीतिचा आजार हा

स्वार्थ तू पाहू नको नात्यांमधे
सूख ना देऊ शके आचार हा

शब्द-शब्दा वापरा सांभाळुनी
जीवघेणा शब्द रे हत्यार हा

हाय गरिबी शाप हा जगण्यातला
आठ प्रहरी बनवितो बेजार हा

ठेवशी विश्वास का नेत्यावरी ?
आपुल्या स्वार्थापुढे लाचार हा
    (कवी डॉ. अमेय गोखले)


गंध मातीचा मधाने दाटला
सांजरंगांनी फुलोरा थाटला

गर्द पानांतून आले पाखरू
सूर झाडाच्या गळ्यातिल आटला

श्वास वार्‍याने फुलांचा चुंबुनी
डाहळीचा हात हाती घेतला

येथुनी गेलो तुझ्या मी संगती
चंद्र होता केशराने पेटला

आशयाने शब्द सारे शोधुनी
गाढ मौनाचा किनारा गाठला
    ( मंगेश पाडगावकर )


सोसवेना ही उदासी साथ दे
सोबतीच्या चांदण्याची रात दे

झाड सुकलेले तसा एकांत हा
तू जिवाला जीव दे बरसात दे

मी असा हा दूर माझ्यापासुनी
जवळपण माझे तुझ्या बहरात दे

चेहर्‍यांच्या भोवती भिंती उभ्या
ओळखीचा शब्द या शहरात दे

संपतो काळोख , हा येते उषा
ठेव तू विश्वास , हाती हात दे
     (मंगेश पाडगावकर)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment