Sunday 3 January 2016

दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा

मराठी पंधरवडा - दिवस दुसरा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उपक्रम २ - दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा आणि जमल्यास वाक्यात उपयोग करा : रात्री ११ वाजेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे.

१. शोणित
२. षटकर्णी
३. लोकेषना
४. वामलोचना
५. पालवे
६. सर्फ
७. भिटीभिटी
८. प्रभंजन
९. निर्माल्य
१०. स्थविर

     IIज्ञानभाषा मराठीII
IIमाझी शाळा📚माझी भाषाII

➡ संदेश पुढे पाठवा ➡

उत्तरे :-


शोणित - 'शोण' म्हणजे लाल रक्त. रक्त लाल असते म्हणून 'शोणित' म्हणजे रक्त
- अनेक जवान स्वत:च्या  शोणिताने भारतमातेची पूजा करतात. 

===========**===========
षट्कर्णी - सहा कानांचा समूह. 
सहा कान म्हणजे ३ माणसे. ३ माणसांना जी गोष्ट कळते, ती गुप्त कशी राहील?
- षट्कर्णी गोष्ट गावभर पसरायला कितीसा वेळ घेणार?

===========**===========


लोकेषणा - लोकांची इच्छा
लोकेषणे पुढे राजाचे काहीच चालले नाही . 

===========**===========


वामलोचना - सुंदरनयना
मेनकेसारख्या वामलोचनेच्या मोहपाशातून विश्वामित्रासारखा तपस्वी सुद्धा सुटला नाही .

===========**===========

सर्फ - सफाई
मूळ शब्द मराठी नसल्याने संकलनातून काढून टाकला आहे..

===========**===========

 शब्द : प्रभंजन - सोसाट्याचा वारा किंवा वादळ
निसर्गातील असो वा मनाच्या आतील  प्रभंजन उलथापालथ करतेच .

===========**===========


शब्द : निर्माल्य - फुलाचे फुलपण जेव्हा नाहीसे होते तेव्हा त्याचे निर्माल्य बनते.
देवावरचे निर्माल्य हातात उचलून त्याने शपथ घेतली 

===========**===========

स्थविर - म्हातारा
 स्थविर नागसेनाच्या धम्म ज्ञानामुळे मिलिंद राजा सर्वसंग त्यागून धम्मशासनात सामील झाले.

===========**===========
शब्द - पालवे - 
झाडाची पालवी अन् डोयीवरचे पालव उन्हाळ्यात सारखेच कामाचे 

===========**===========
शब्द - भिटीभिटी- 
छोटा बाळ आवाज आला की भीटिभीटि पाहतो..

===========**===========








No comments:

Post a Comment