Thursday 7 January 2016

मराठीच्या द्वारी🔣गणिताची वारी

💡स्वतः मराठीतून शिका
💡मुलांना मराठी माध्यमातून शिकवा

आज आपण दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ते शिकणार आहोत

अ) सर्व प्रथम दोन्ही स्थानावर असलेल्या अंकाचे वर्ग घ्या
टीप: वर्ग दोन अंकीच असावा .

उदा. ३ चा वर्ग फक्त ९ न लिहिता ०९असा लिहावा.

ब) दोन्ही अंकांचा गुणाकार करून त्याची  दुप्पट घ्यावी व तिच्यापुढे ० लिहावा

क) वरील दोन्ही संख्येची बेरीज म्हणजे आपल्या संख्येचा वर्ग होय

उदा . ४७ चा वर्ग काढणे

अ) ४ व ७ चा वर्ग        
= १६४९

ब) ४ व ७ च्या गुणाकाराची दुप्पट
= ५६०

क) दोन्हीची बेरीज    
=२२०९

म्हणून ४७ चा वर्ग = २२०९

टीप :- तुमच्याकडे अजून सोपी पद्धत असेल तर, आम्हाला नक्की सांगा!

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा 📚 माझी भाषा ||

No comments:

Post a Comment