Friday 1 January 2016

वेळापत्रक

🚩मराठी पंधरवडा🚩
➖➖➖➖➖➖➖

नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, १ ते १५ जानेवारी २०१६ शासनाने मराठी पंधरवडा म्हणून जाहीर केला आहे. मराठी भाषा संवर्धन हे समुहाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक असल्याने, आपण मराठी पंधरवडा अधिकाधिक चांगल्या आणि कल्पक पद्धतीने कसा राबवता येईल याचा आराखडा बनवला आहे :

***समुहाचे १५ दिवसांसाठी १५ उपक्रम खालीलप्रमाणे***

१) मराठी दागदागिने ओळखा - १ जानेवारी - शुक्रवार
# दागिन्यांचे फोटो गुगल फॉर्म मध्ये दाखवले जातील, ते ओळखून योग्य पर्याय निवडणे

२) दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा - २ जानेवारी - शनिवार
# जुने मराठी शब्द, किंवा वापरात नसलेले शब्द दिले जातील त्याचे अर्थ शोधून वाक्यात उपयोग करणे

३) वाचन कट्टा/कविता वाचन - ३ जानेवारी - रविवार
# आवडलेल्या पुस्तकाचा अंश /कविता वाचून ध्वनिमुद्रण समुहात पाठवणे

४) मराठी काव्यगायन कार्यक्रम - ६ जानेवारी - बुधवार
# आवडत्या कवितेचे चाल लावून ध्वनीमुद्रणासहित समुहात पाठवणे, समुहात दर्जेदार कविता पोस्ट करणे

५) मराठीची श्रीमंती ऑनलाईन परीक्षा - ५ जानेवारी - मंगळवार
# मराठी समानार्थी/विरुद्धार्थी शब्द/वाक्य/काही प्रमाणात व्याकरण - ऑनलाईन परीक्षा

६) मराठी कथाकथन कार्यक्रम - ६ जानेवारी - सोमवार
# आवडलेल्या कथेचे वाचन ध्वनीमुद्रणासहित समुहात पाठवणे, समुहात दर्जेदार कथा पोस्ट करणे.

७) दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा  - ७ जानेवारी - गुरुवार
# दिलेल्या शब्दाचा योग्य प्रकारे वाक्यात उपयोग करणे

८) मराठी पुस्तके ओळखा - ८ जानेवारी - शुक्रवार
# लोकप्रिय मराठी पुस्तकांच्या नावातील अक्षरे जुळवून पुस्तकाचे नाव शोधणे

९) मराठी साहित्यिक ओळखा - ९ जानेवारी - शनिवार
# फोटो पाहून साहित्यिक ओळखणे - गुगल फॉर्म

१०) वाचन कट्टा - १० जानेवारी - रविवार
# आवडलेल्या पुस्तकाचा अंश /कविता वाचून ध्वनिमुद्रण समुहात पाठवणे

११) लोकप्रिय हिंदी गाण्यांचे मराठी रुपांतर स्पर्धा - ११ जानेवारी - सोमवार
# लोकप्रिय हिंदी गाण्याचे मराठी मध्ये रुपांतर करून समुहात पोस्ट करणे, आणि बाकी लोकांना मूळ गीताचे नाव विचारणे

१२) मराठीची श्रीमंती - १२ जानेवारी - मंगळवार
# मराठी समानार्थी/विरुद्धार्थी शब्द/वाक्य/काही प्रमाणात व्याकरण - ऑनलाईन परीक्षा

१३) गडकिल्ले आणि त्यांचे जिल्हे ओळखा - १३ जानेवारी - बुधवार
# गडकिल्ले कोणत्या जिल्ह्यातले आहेत, हे ओळखणे - गुगल फॉर्म

१४) पारंपारिक वेशभूषा दिन -
# सर्वांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये आपली छायाचित्रे काढून समूहावर पाठवावीत

१५) महाराष्ट्राचा इतिहास - परीक्षा - १५ जानेवारी - गुरुवार
# महाराष्ट्राची संतपरंपरा तसेच थोर राजे-महाराजे यांच्यावर आधारित ऑनलाईन परीक्षा


चला तर सर्व जण या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन मायमराठीचे आशीर्वाद घेऊ या !


मराठीचा कराल जप,
तर वाढेल मराठीचा खप....


       ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment