Saturday 16 January 2016

भाषेचे वैशिष्ट्य

# शिक्षणावर बोलू काही #
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगात असंख्य भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे आपले एक वैशिष्ट्य असते. भारतीय भाषांचे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट उच्चारण. प्राचीन काळी यवनादी परकीय लोकांना ‘म्लेंच्छ’ म्हणत असत. त्याला कारण होेते. म्लेंच्छ् हा मूळ धातू असून ‘त्याचा अर्थ अस्पष्ट उच्चार’ असा आहे. म्हणजे जे अस्पष्ट उच्चार करतात ते म्लेंच्छ, हा अर्थ होता. याचाच अर्थ असा अभारतीय विशेषत: ‘यवन’ अस्पष्ट उच्चार करायचे. असो. हे सर्व सांगायचे कारण उच्चार ज्या तोंडावाटे म्हणजे कण्ठ, तालू, मूर्धा, दन्त, ओष्ठ यांच्या सह जिभेच्या साहाय्याने होतो तिचे वळण बालवयात संस्कारक्षम, वयातच लागायला पाहिजे. जसे मराठी बालकं ‘ळ’ चा उच्चार करू शकतात. पंजाबी उत्तरप्रदेशी प्रौढ तो उच्चार करू शकत नाहीत. कारण उच्चारणाचे संस्कार. मग बालवयात कोणते वर्ण उच्चार शिकवायला हवे? याचे नि:संदिग्ध उत्तर आहे ‘भारतीय’ भाषेचे. कारण इंग्रजीत अइउऊ इत्यादी २६ मुळाक्षरे म्हणजे ‘उच्चारण ध्वनी’ आहेत तर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये इंग्रजी पेक्षा जास्त ध्वनी म्हणजे (वर्ण उच्चारण) आहे. पुढे भाषा व त्यातील वर्णसंख्या म्हणजे ध्वनी संख्या दिलेली आहे.

टेबलवरून सिद्ध होते की कोणतीही भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा वर्णोच्चाराच्या बाबतीत श्रीमंत आहे. शिवाय उच्चार स्पष्टता ही भारतीय भाषांची खासीयत आहेच. जिभेचे वळण बालवयातच लागते हा सर्वांचा अनुभव आहेच. मग ग्लोबलायझेशनच्या क्रेझ मुळे इंग्रजी उच्चारण बालकाला शिकविणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार इतरांचे जाऊ द्या पण पालक म्हणून आपण करणे जरुरीचे नाही का? लहानबालकांना भारतीय भाषांमधील अक्षरज्ञान वा वर्णमाला शिकविणे बालकाच्या दृष्टीने अधिक लाभदायी नव्हे का?

मग बालकाला ए फॉर ऍपल पेक्षा अ, आ, ई शिकविणे जास्त गरजेचे नाही काय?

संस्कृत (वैदिक) ६४
संस्कृत (लौकिक) ५२
पाली ४३ किंवा ४१
हिंदी ४९
मराठी ४९
बंगाली ५२
तेलगू १६ + ४१
तामिल १३+ १८
गुजराती ४९
उर्दू ३६+१२
फारसी २९
अरेबी ३१
इंग्रजी २६
मल्याळम् १५+४१

- डॉ. प्रज्ञा देशपांडे

महाराष्ट्राचा इतिहास - ऑनलाईन परीक्षा

१. सातवाहन राजा हल याने पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

पर्याय १ - गाथा सप्तशती


२. कैलास लेणे कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले

पर्याय ३ - राष्ट्रकुट


३. मोडी लिपीचा उद्गाता म्हणून कुणाला मानले जाते?

पर्याय ४ - हेमाडपंत/हेमाद्रीपंत


४. देवगिरीचा किल्ला कुणाच्या काळात बांधला गेला?

पर्याय २ - भल्लमदेव यादव


५. मौजा म्हणजे ........... होय.

पर्याय ३ - गाव


६. 'संकृत वाणी देवे केली | तरी प्राकृत काय चोरापासूनि झाली?' हे संस्कृत पंडितांना कुणी ठणकावून विचारले?

पर्याय ४ - संत एकनाथ


७. 'मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा' हा उपदेश कुणी केला?

पर्याय १ - समर्थ रामदास


८. संत चळवळीचे ............. हे केंद्र होते.

पर्याय ४ - पंढरपूर


९. जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ... तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा |

हा संदेश लोकांच्या मनावर कुणी बिंबवला?

पर्याय २ - संत तुकाराम


१०. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला?

पर्याय १ - मालोजी राजे भोसले


११. जिजाऊ आणि शिवरायांना आपल्या बरोबर कर्नाटकात घेऊन जाताना, पुणे जहागिरीचा कारभार शहाजी राजांनी, आपल्या कोणत्या विश्वासू सेवकावर सोपवला?

पर्याय १ - दादोजी कोंडदेव


१२. प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववन्दिता । शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। - ही राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे?

पर्याय ३ - संस्कृत

१३. जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब कुणी दिला होता?

पर्याय २ - आदिलशहा

१४. 'अमात्य' या पदाचे कार्य कोणते?

पर्याय ४ - राज्याचा जमाखर्च पाहणे

१५. राज्यव्यवहारकोश या ग्रंथाची निर्मिती कुणी केली.

पर्याय १ - पंडित धुंडीराजलक्ष्मण व्यास

१६. सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा ................ होय.

पर्याय ३ - एक दशांश भाग

१७. पानिपतमध्ये झालेल्या पराभवानंतर उत्तरेत मराठ्यांची सत्ता पुनर्स्थापित करण्यात खालीलपैकी कोणाचा सिंहाचा वाटा होता.

पर्याय २ - महादजी शिंदे

१८. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील, मोतीतलाव येथील लढाईत ................ याला पराभूत केले.
पर्याय ३ - हैदरली

१९. खाली दाखवलेल्या शस्त्राचे नाव काय?
पर्याय १ - कुकरी

२०. फोटोत दाखवलेल्या ढालीचा प्रकार कोणता?
पर्याय ४ - मराठा - कासवाच्या पाठीची ढाल

===============================

🚩मराठी भाषा पंधरवडा 🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖

💡दिवस - शेवटचा 

विषय - महाराष्ट्राचा इतिहास (संत परंपरा, राजे-महाराजे, शस्त्रास्त्रे)

निकाल खालीलप्रमाणे :

१. विकास धात्रक - 1/15/2016  9:39:27 PM - १९ गुण - मुंबई 

२. रामदास कालोथे - 1/15/2016  9:20:57 PM - १८ गुण - अहमदनगर

३. हनुमंत लोखंडे - 1/15/2016  9:24:44 PM - १७ गुण - बीड 

४. निवेदिता खांडेकर - 1/15/2016  9:55:52 PM - १७ गुण - नवी दिल्ली

सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन💐

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

गझलची तोंड ओळख - भाग १६

: गझल वृत्त :
          सौदामिनी

🎶 एकूण मात्रा : 18

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
1  2  2  1  2  2  1  2  2  1  2
= 18

(गा - गुरू , ल -लघु)



मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले

लपंडाव माझातुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले

तुझ्या अंतरी कोणती वादळे ?
मला हेलकावे बसू लागले

तुझी पाहता पाकळीपाकळी
गडे , पाहणेही फसू लागले

अशी ही कशी तीच ती उत्तरे ?
मला प्रश्न माझे हसू लागले

कुठे संपल्या रोजच्या यातना ?
पुन्हा हे दिलासे डसू लागले

कसा मी रडू ? हे कसे लोकही ?
स्वतःचेच डोळे पुसू लागले
            (सुरेश भट)

गझलची तोंड ओळख - भाग १५

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 15 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💐💐💐💐💐💐💐💐💐

♻ आज काही निवडक , गाजलेल्या मराठी गझल देत आहे ♻


तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
                      (सुरेश भट)


मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग

गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
                 (सुरेश भट)


आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
                 (सुरेश भट)


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
                           (सुरेश भट)


केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !

उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
                  (सुरेश भट)


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
                     (सुरेश भट)


डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
                 (मंगेश पाडगावकर)


मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
                     (सुरेश भट)


भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
                   (सुरेश भट)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

पानिपत! पराभव नव्हे तर गुरुदक्षिणा

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपती॥

- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"

पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास आठ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस बिन मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..

म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.

आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".

- सौरभ वैशंपायन.

गझलची तोंड ओळख - भाग १४

📝 गझलची तोंड ओळख - भाग 14 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
      सति जलौघवेगा

🎶 एकूण मात्रा : 24

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
 1 2  1  2  2  1  2  1  2  2  1 2  1  2  2
= 24

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले

करू तरी काय सांग माझ्या कलंदरीचे ?
कसा फिरू ? आसवांत रस्ते बुडून गेले

कुणाकुणाची किती किती खंत बाळगू मी ?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले
                 (सुरेश भट)


जुना जरीही पराभवाशी करार आहे
मनात माझ्या बगावतीचा विचार आहे

पहा म्हणाले पवित्र आहे नदी तिथे ती
पुढे जाऊनी खरे पहाता गटार आहे

तनामनाची पुन्हा कुणाला विकून लज्जा
गुलाम बनुनी जगावयाला नकार आहे

बुरेपणाचा उगाच सल्ला कुणास देऊ ?
भलेपणाही इथे तयांचा उधार आहे

लढा म्हणाला इथे अम्हाला पुढे करोनी
तुरूंगवासी अम्ही , अता तो फरार आहे
          (कवी डॉ. अमेय गोखले)


जुने पुढारी तपासतो आजकाल आम्ही
नवे नवे ओळखून घेतो दलाल आम्ही

बघून घ्या आज आमुची ही भणंग वस्ती
सुधारतो आज लोकशाही बकाल आम्ही

म्हणाल त्याला मते अम्ही नेहमीच देऊ
युगायुगांचे गुलाम आम्ही , हमाल आम्ही

जुन्या गुन्ह्यांची समर्थने एवढी कशाला ?
विचारला का तुम्हा 'नको तो' सवाल आम्ही ?

अलीकडे उद्धरून जातात सर्व पापी
तयांस पापे करू तयांची बहाल आम्ही

मिळेल तेव्हा मिळेल तो सूर्य चोरलेला
निदान ही पेटतीच ठेवू मशाल आम्ही

उद्यावरी सोपवू नये फैसला उद्याचा
अखेरचा चोख लावू निकाल आम्ही
                   (सुरेश भट)


तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रसात्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग तूच माझी-तुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही

विझून माझी चिता लोटली युगे तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
                (सुरेश भट)


तुझ्याचसाठी निळे चांदणे भुलून येते
तुझ्याचसाठी वेल फुलांनी फुलून येते

एक इशारा नजरेचा हा तुझ्या पुरेसा
वार्‍याच्या ओठांवर गाणे जुळून येते

तू जेव्हा प्रतिबिंब आपले तळ्यात बघसी
टपोर कमळांनी हे पाणी खुलून येते

प्राजक्ताचे झाड तसे आकाश निळे हे
झुकते खाली , तुझ्या घरावर झुलून येते

तुझी खुषी हा मोहरण्याचा उत्सव असतो
जगणे अपुला अर्थ नव्याने कळून येते
             (मंगेश पाडगावकर)


दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा
विचारला मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा

अताच सारे कसे इथे शांत शांत होते
अताच मी ऐकला पुन्हा बार बंदुकीचा

कशास मी रक्त दाखवू आपुले कुणाला ?
अजूनही घाव हा तसा त्या न लायकीचा

अता इथे राहतात आवाज हुंदक्यांचे
खरेच हा गाव माणसांच्या भुताटकीचा

जरी तुझ्या पाकळ्यांत मी गुंतलो तरीही
गडे , तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा

अता जगू चांदण्यातल्या चाहुलींप्रमाणे
करार माझा-तुझा असा ह्या चुकामुकीचा
                 (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

मराठी मेवा - नमस्ते कुसुमाग्रजा

मराठी मेवा - दिवस तेरावा - क्रमांक १३

कविता : नमस्ते कुसुमाग्रजा

कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत

काव्यवाचन : सौ. यामिनी तेलंग

कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! नमस्ते कुसुमाग्रजा! नमस्ते कुसुमाग्रजा! सय ठेवूनी गेलात गोड हिरव्या मखमली नि रेशीम बंधनात किमया तुमच्या जादूभऱ्या शब्दांतुनी जगता सजविले कुसुमे तुम्ही पसरुनी हळूवार प्रेमभावना त्यातुनी स्रवती आजही चिरतरुण मने हृदयस्पर्श अनुभवती भवतीच्या ऋतुंची किमया रुजविली मनोमनी त्या सामर्थ्ये आजही फुले गंधित फुलती जीवनी निष्पर्ण रानी फुलविली कधी प्रेममाया कधी जागविली वीरता ललकारुनी धैर्या ऋषीतुल्य तुम्ही, गुरुस्थानी आम्हा वारसा दिधला वंद्य तुम्ही आम्हा द्या गोडवा वाणीचा नि लेखणी तेजाची जन्मलो या भारती, सेवा करु मराठी मायबोलीची द्या आशीर्वाद, कवीश्वर तुम्ही प्रतिभावंत पूज्य तुम्ही, करतो मानाचा मुजरा आम्ही भाग्यवंत

- सौ. मेधा श्रीश कामत


किल्ले/किल्ले स्थित असलेले जिल्हे ओळखा
















उत्तरसूची :-

१. शिवनेरी 
२. रायगड जिल्हा 
३. लोहगड 
४. औरंगाबाद जिल्हा 
५. पन्हाळा
६. सातारा जिल्हा 
७. रायगड 
८. सिंधूदुर्ग जिल्हा 
९. तोरणा 
१० पुणे


परीक्षेचा निकाल खालीलप्रमाणे :-

१. मंजुषा माने - 1/13/2016  8:20:17 PM - १० गुण - सोलापूर 
२. रोहित बोराडे - 1/13/2016  8:21:59 PM - १० गुण - पुणे 
३. विकास लक्ष्मण धात्रक - 1/13/2016  8:23:45 PM - १० गुण - मुंबई 
४. शिवभक्त महेश ऊत्तम जगताप - 1/13/2016  8:26:00 PM - १० गुण - सातारा 
५. पंकज - 1/13/2016  8:30:58 PM - १० गुण - नाशिक 
६. हर्षदा - 1/13/2016  8:46:41 PM - १० गुण - पुणे 
७. प्रज्ञा वळूंज - 1/13/2016  8:48:28 PM - १० गुण - ठाणे 
८. गणेश शिंदे - 1/13/2016  9:19:32 PM - १० गुण - अ.नगर
९. विजय महाले - 1/13/2016  9:41:57 PM - १० गुण -  रायगड



गझलची तोंड ओळख - भाग १३

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 13 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
        हिरण्यकेशी

🎶 एकूण मात्रा : 32

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
 1 2  1  2  2  1  2 1  2  2  1  2  1  2  2  1  2  1  2  2
= 32

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की , अजूनही चांदरात आहे...

उगीच स्वप्नात सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला ? तुझ्याच जे अंतरात आहे...

कळे न मी पाहते कुणाला , कळे न हा चेहरा कुणाचा ?
कसा मला भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे...

उगाच देऊ नकोस हाका , कुणी इथे थांबणार नाही
गडे , पुन्हा दूरचा प्रवासी , कुठेतरी दूर जात आहे...

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे...
                             (सुरेश भट)


प्रकाशपूजक , परी दिव्याला कुठून मी घासलेट आणू ?
कुणी न ऐके इथे कुणाचे , घसा कशाला फुकाच ताणू ?

भयाण दर्या , खवीस वारा , नसे तयाला मुळीच पर्वा
क्षयी कुडी ही तशीच होडी , नसे दिवा वा नसे सुकाणू...

इथून लाथा , तिथून लाथा , बसून ढुंगण मुळात फाटे
दिसे परंतू कुठे न कर्ता , शिव्या तरी मी कुणास हाणू ?

किती बुवा नागवून गेले , जुन्याच पोथ्या , जुनी वाळवी
भविष्य बैसे दबा धरोनी , जसा विषारी कुणी जिवाणू...

घरंगळे ही खटारगाडी , उतार सारा , असंख्य खड्डे
मलाच मी हा असा तिर्‍हाइत , कुणास सांगू ? कुणास जाणू ?
                   (मंगेश पाडगावकर)


सख्या तुला भेटण्यास मी या , भल्या पहाटे निघून आले
घरातुनी चोरपावलांनी , लपून आले... जपून आले...

तुझ्याच स्वप्नात रात गेली , तुझ्याच स्वप्नात जाग आली
तुझ्याच स्वप्नात जाणार्‍या , जगातुनी मी उठून आले...

विचारले मी न अंबराला , विचारले मी न वारियाला
तुझ्या मिठीचा निरोप आला , मिठीत मी मोहरून आले...

अताच हा दूर तारकांचा , कुठेतरी काफिला निघाला
अताच हे चांदणे गुलाबी , हळूच मी पांघरून आले...

गडे मला बोलता न आले , कुणीकुणी बोललेच नाही
अखेर माझ्याच आसवांना , तुझा पता मी पुसून आले...
                          (सुरेश भट)


पुन्हा पुन्हा का मनात माझ्या , विचार येती तुझेच आता
शब्द माझिया कवितांमधले , गुलाम होती तुझेच आता.....

पहा इथे या फुलाफुलांना , तुझ्या स्मृतींचा सुगंध येतो
पहा पाखरे माझ्यासाठी , गाणे गाती तुझेच आता.....

कुरळ्या कुरळ्या तुझ्या बटांशी , झुळझुळणारे अवखळ वारे
इथे येऊनी माझ्यापाशी , क्षेम सांगती तुझेच आता.....

साखरझोपेमध्ये पहाटे , लोक पाहती स्वप्न सुखाचे
त्या स्वप्नातुन माझे डोळे , दर्शन घेती तुझेच आता.....

नसेन कोणी महाकवी मी , मेघदूत हे तरी धाडले
तेही पुन्हा येऊन येथे , निरोप देती तुझेच आता.....
                 (कवी डॉ. अमेय गोखले)


जिवंत माझ्या कलेवराला , अजून आयुष्य हाक मारी
कशास एका भिकारड्याला , पुकारतो हा दुजा भिकारी...

भिकेत आणून आस तेव्हा , प्रतारणांचा प्रपंच केला
अता दुवा देत देत माझी , जिथे तिथे हिंडते शिसारी...

कशी करू सांत्वने कुणाची ? अजून अश्रू कितीक झेलू ?
पिढ्यापिढ्यांच्या मनोगतांचा , कसा बनू एकटा फुलारी ?

मिळेल त्या तोतया क्षणाशी , जमेल तो डाव मांडला मी
अजूनही स्वप्नद्यूत चाले , अजून हा मी असा जुगारी...

दुभंगलेल्या उरात माझ्या , पहा किती सूर्य झेप घेती
चुकून हे रक्त पेटण्याची , अधेमधे दाखवी तयारी...

असंख्य माझ्या पराभवांचे , चिणून मी टाकिले इरादे
मधेच ही बंडखोर गीते , उफाळुनी फुंकिती तुतारी...

उगीच एका दिवंगताने , करू नये एवढी अपेक्षा
असा कसा हा वसंत येई , पुन्हा पुन्हा माझियाच दारी...
                      (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

मराठीची श्रीमंती

💰मराठीची श्रीमंती : जुने ते सोने💰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खालील उत्तरसूची पहा आणि त्यावरून आपले गुण ठरवा.

परीक्षेत सहभाग नोंदवल्याबद्दल आपले अभिनंदन व हार्दिक आभार🙏



१) खालील पर्यायातील म्हण ओळखा
अ) नाकीनऊ येणे
ब) नाकापेक्षा मोती जड✅
क) नाकदुऱ्या काढणे
ड) नाकाला मिरच्या झोंबणे


२) इतक्या सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात रमेशसारखा दारुडा व जुगारी मुलगा जन्मावा?.... यासाठी खालील पैकी कोणता पर्याय निवडाल?
अ) दुधात मीठ
ब) कोळशात हिरा
क) चिखलात कमळ
ड) तुळशीत भांग✅


३) खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही ?
अ) रिक्षा✅
ब) पेन
क) कोट
ड) सर्कस


४) ज्या गटात ' जागा ' या शब्दाचे अचूक अर्थ आहेत असा गट ओळखा.
अ) जागल्या , स्थळ
ब) स्थान , विभाग
क) ठिकाण , जागृत✅
ड) ठिकाण , कठोर


५) चुकीची जोडी ओळखा
अ) २५ वर्षे - रौप्य महोत्सव
ब) ५० वर्षे - सुवर्ण महोत्सव
क) ७५ वर्षे - हीरक महोत्सव
ड) १०० वर्षे - सहस्त्र चंद्र दर्शन महोत्सव✅


६) बरोबर जोडी ओळखा
अ) त्र्यंबक बापूजी ठोंबरे - कवी बी
ब) काशिनाथ हरी मोडक - माधवानुज✅
क) शंकर काशिनाथ गर्गे - गिरीश
ड) शंकर केशव कानेटकर - आरती प्रभू


७) खालीलपैकी कोणता शब्द ' विधु ' याचा समानार्थी शब्द नाही?
अ) हिमांशू
ब) सुधांशू
क) सोम
ड) चंडांशू✅


८) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
अ) गोळी
ब) मोळी
क) केळी✅
ड) थाळी


९) गटात न बसणारा शब्द ओळखा
अ) तिर्यक✅
ब) तीर्थयात्रा
क) गीर्वाण
ड) कीर्तन


१०) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा
अ) पारंपरिक
ब) पाश्चात्य✅
क) श्रुतकीर्ती
ड) लवचीक


     IIज्ञानभाषा मराठीII
IIमाझी शाळा📚माझी भाषाII


===================================

टीप - ३ ऱ्या प्रश्नाच्या पर्यायांच्या बाबतीत साशंकता असल्याने, निकालातून ३ रा प्रश्न वगळण्यात आला होता.

परीक्षेचा निकाल :

१. गणेश शिंदर - ९ गुण - 1/12/2016  9:04:29 PM - अहमदनगर
२. राजेश जाधव - ८ गुण - 1/12/2016  9:11:39 PM - लातूर
३. विजय बिन्दोड - ८ गुण - 1/12/2016  9:22:57 PM - यवतमाळ

नभ उतरू आलं

आपल्या लहानपणीच आपली ओळख पावसाशी होते;चिऊ अन काऊच्या गोष्टीमधून. जोराचा पाऊस येतो अनकावळ्याचे शेणाचे घरटे वाहून जाते तर चिऊ ताईचेमेणाचे घर मात्र तग धरून राहते.

आपण जरा मोठे होतो व शाळेचे लचांड आपल्या पाठीलागते. अभ्यास, बाईंचा ओरडा या सर्वांचे पिशाच्चआपल्या मानगुटीवर बसते. हे पिशाच्च काही काळापुरतेतरी मानगुटीवरून उठावे म्हणून आपण सर्वांनीचलहानपणी आर्जव केलेले असते, ‘सांग सांगभोलानाथ, पाऊस पडेल का? शाळेभोवती तळेसाचून सुट्टी मिळेल का?’ आणी खरोखरच आपलीविनवणी ऐकून पाऊस आला की आपला हट्ट सुरुव्हायचा,' ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे'

विद्यार्थी दशेतून तारुण्यामध्ये प्रवेश करताना प्रेयसीच्याआधी आपला सखा होतो तो हाच पाऊस. 'जिंदगी भरनहीं भूलेंगे वो बरसात की रात, एक अनजानहसीनासे मुलाकात की रात' किंवा 'एक लडकी भिगीभागीसी' अशा गाण्यांमुळे आपल्यालाही धुंद पावसाळीसंध्याकाळी आपली मधुबाला मिळावी अशी सुप्तमनीषा जागी होते. आपला सखा झालेला पाऊस कधी तरी अवचित बरसावा व आपल्या प्रेयसीला त्याने आपल्या प्रेमात न्हाऊ घालावे अशी वेडी आशा कित्येकजण मनात बाळगून असतात

खूप प्रयत्नांती आपण आपली मधुबाला मिळवतोच.तिला 'प्यार हुआ इकरार हुआ है’ असे सांगतानापाऊस पण आपल्यासोबत असेल तर कित्ती बरे होईलअसे वाटते. मुसळधार पावसात एकाच छत्रीमध्येप्रेयसीला घेऊन फिरण्यात काय थ्रिल असते ते राज वनर्गिस ने आधीच पडद्यावर दाखविले असल्याने आपणमुद्दामुनच छत्री विसरलेलो असतो. प्रेयसीचा तो ओलेता स्पर्श पावसाळी वातावरणाला अजूनच नशीला करून जातो. आणी त्यात जर विजेचा लपंडाव सुरु झाला व प्रेयसी 'बादल यु गरजता है, डर कुछ ऐसा लगता है ' असे म्हणत आपल्याला घाबरून बिलगली की मिळणारा स्वर्ग सुखाचा आनंद पावसाच्या धारांना अमृत धाराच बनवून टाकतो.

प्रियकर व प्रेयसी दोघांनाही एकमेकांचा सहवास अनंत काळासाठी हवाच असतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी दोघेही पावसाचीच मदत घेतात. आपल्याला जरा वेळच व ते देखील चोरून भेटायला आलेल्या प्रेयसीला थांबविण्यासाठी प्रियकर थेट बरखा राणी ला आर्जव करतो, 'बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा दिलबर जा ना पाए, झूमकर बरसो'. आणी जर अनेक दिवसांच्या विरहानंतर प्रियकर भेटला असेल तर प्रेयसीला देखील सेम फिलिंग वाटत असते. 'बरस बरस रे मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम' असे सांगणारी ती, पुढे जाऊन हे ही म्हणते की, 'बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात'

प्रेयसी व प्रियकर दोघांसाठी प्रत्येक ऋतू हा प्रेम ऋतुच असतो पण झिम्माड पावसाची नशाच काही और असते. आपल्या बोलाविण्याखातर काळ वेळ न पाहता धावत येणाऱ्या प्रेयसीचे अप्रूप प्रियकराला नसले तरच नवल. म्हणूनच त्याच्या तोंडी नकळत येते, 'भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची'

पावसामध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये विसावताना खट्याळ प्रियकर आपल्या प्रेयसीला जेव्हा विचारतो,'भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में ऐसी बरसातों में, कैसा लगता है?' तेव्हा प्रेयसीचे उत्तर असते, 'ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदन को भीगो के मुझे छेड़ रहे हो'

पाऊस हा दोघांमध्ये तिसरा असून देखील कबाब में हड्डी वाटत नाही ते याच कारणांमुळे.

पावसाची गम्मत असते नाही! बाहेरून तो अंग प्रत्यांग ओलेचिंब करत असतो पण प्रियकर - प्रेयसीच्या अंतरंगात मात्र मदनज्वर भडकावीत असतो. आणि हा ज्वर चढला की जगाची बंधने झुगारत मन बंड करून उठते व खुशाल गाऊ लागते,'आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ'.बादल से छम-छम शराब बरसे, सांवरी घटा से शबाब बरसे अशी काहीशी अवस्था झाल्याने प्रेयसीचा पदर देखील ढळलेला असतो अगदी 'नमक हलाल' मधील स्मित पाटील सारखा.

पण काही प्रेयसी मात्र शालीनतेचा पदर ओढून प्रियकराला आडूनच सुचवू पाहतात.. 'ओ सजना, बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अँखियों में प्यार लाई'. जेव्हा ती सुचविते  हे राजसा, आता मला जास्त दूर ठेवू नकोस. आणी तिच्या या आर्जवाला प्रतिसाद देऊन प्रियकर तिथे पोहचला व त्याच वेळी जर प्रेयसीच्या केसांमधून पाऊस ओघळत असेल तर प्रियकर नकळत गुणगुणतो , 'न झटको झुल्फ से पानी, ये मोती फूट जायेंगे, तुम्हारा कुछ न बिगड़ेगा, मगर दिल टूट जायेंगे'. जणू प्रियकराला हेच सुचवायचे असते की प्रिये, तुझे ओलेते दर्शन मला डोळे भरून साठवून दे

प्रेयसी व प्रियकराला जसे 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ' असे गायला आवडते, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिकच 'पावसात एकमेकांच्या हातात हात घालून 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन' असे म्हणत वरळी सीफेस किंवा मरीन ड्राइव्ह ला फेरफटका मारायला आवडते. आपल्या पैकी अनेक प्रेमवीरांना हे पटले असेलच

प्रियकर व प्रेयसी एकदाचे नवरा बायको होऊन 'नांदा सौख्यभरे' या उक्तीप्रमाणे दाम्पत्य जीवन एन्जोय करू लागतात. अशावेळी अनुभव चित्रपटातील तनुजा व संजीव कुमार प्रमाणे खिडकीतील पावसाला साक्षी ठेवत हे नवरा बायकोचे जोडपे परस्परांवरील विश्वास व प्रेम अजून दृढ करतात.' मेरी जान; मुझे जान ना कहो' असे म्हणत लडीवाळपणे बायको जेव्हा नवऱ्याच्या मिठीत विसावते तेव्हा पावसाचे डोळे पण अजून झरू लागतात

पाऊस जसा आनंदी क्षणांचा सोबती असतो तसा दुःखद स्मृतींचा देखील.'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या गाण्यात आपल्या आईचे कायमचे दुरावणे त्या पावसाच्या साक्षीने नायक अनुभवतो. आपल्या रडण्याला 'घनव्याकूळ ' असे विशेषण लावून तो उदास दुःखी नायक जणू पावसाला हि आपली बोच बोलून दाखवितो.

तर इजाजत मधील नायिका 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ' या गाण्यात प्रियकराला सांगते, पावसाच्या साक्षीने तू व मी अनुभवलेल्या ओलेत्या रात्री, ज्या अजून ही तुझ्या बिछान्यात विसावलेल्या आहेत त्या मला परत कर. .'सावन के कुछ भिगे भिगे दिन' त्या राहिलेल्या सामानात आहेत त्या परत कर, 'एक अकेले छत्री में जब जब आधे आधे भिग रहे थे' त्याच्याशी निगडीत सर्व स्मृती, आनंद ज्या काही गोष्टी आहेत त्या परत कर. थोडक्यात काय तर विभक्त होण्याचे दुःख अनुभवताना देखील प्रेयसीला आठवतात ते पावसाळी दिवसच

पाऊस हा अगदी आपल्या सर्व लहान सहान सुख दुःखात नकळत पणे झिरपलेला असतो. पावसात मनसोक्त भिजलेले प्रियकर व प्रेयसी जेव्हा कालांतराने आजी आजोबा होतात तेव्हा देखील आपल्या नातवंडाला खेळविताना त्यांना आठवतो तो पाऊसच.'येरे येरे पावसा तुला देतो पैसा ' हेच गाणे ते आपल्या पुढच्या पिढीला अगदी नकळत पणे शिकवितात कारण सत्य हेच आहे की माणूस पावसाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत नाही तर पाऊसच सर्व मनुष्यजातीला त्याच्या तालावर खेळवत असतो

- प्रशांत दांडेकर            

       || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

गझलची तोंड ओळख - भाग १२

 🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 12 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
             मेनका

🎶 एकूण मात्रा : 19

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2
= 19

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


पावलांना बोलती ज्याच्या झरे
तोच जातो टाकुनी मागे घरे

चालताना गात जातो चालणे
रान होउन गाय हिरवी हंबरे

एकटा काळ्या कड्यांच्या संगती
काळजाला तारकांची झुंबरे

सर्व काट्यांची लिपी होती तरी
रेखिली कोणी फुलांची अक्षरे

का निघाला ? चालला आहे कुठे ?
उत्तरांचे झेल घेती पाखरे
     (मंगेश पाडगावकर)


माणसांना माणसे कंटाळती
चेहर्‍यांना चेहरे हे टाळती

झाडल्या गोळ्या तुझ्या छातीवरी
ते तुझी आता जयंती पाळती

आणला नाही कुणी येथे दिवा
मात्र आता झोपड्या या जाळती

पाखरांचे पार गाणे गोठले
सूर हे नाण्यांस येथे भाळती

रोपही ज्यांनी कधी ना लावले
साप ते झाडांस या वेटाळती

ईश्वराला गाडला खड्ड्यामधे
आणि आता देवळे सांभाळती
       (मंगेश पाडगावकर)


वासनांचा आंधळा अंधार हा
भावनांचा बेगडी बाजार हा

आठवांनी का इथे झुरशी उगा
जीव घेई प्रीतिचा आजार हा

स्वार्थ तू पाहू नको नात्यांमधे
सूख ना देऊ शके आचार हा

शब्द-शब्दा वापरा सांभाळुनी
जीवघेणा शब्द रे हत्यार हा

हाय गरिबी शाप हा जगण्यातला
आठ प्रहरी बनवितो बेजार हा

ठेवशी विश्वास का नेत्यावरी ?
आपुल्या स्वार्थापुढे लाचार हा
    (कवी डॉ. अमेय गोखले)


गंध मातीचा मधाने दाटला
सांजरंगांनी फुलोरा थाटला

गर्द पानांतून आले पाखरू
सूर झाडाच्या गळ्यातिल आटला

श्वास वार्‍याने फुलांचा चुंबुनी
डाहळीचा हात हाती घेतला

येथुनी गेलो तुझ्या मी संगती
चंद्र होता केशराने पेटला

आशयाने शब्द सारे शोधुनी
गाढ मौनाचा किनारा गाठला
    ( मंगेश पाडगावकर )


सोसवेना ही उदासी साथ दे
सोबतीच्या चांदण्याची रात दे

झाड सुकलेले तसा एकांत हा
तू जिवाला जीव दे बरसात दे

मी असा हा दूर माझ्यापासुनी
जवळपण माझे तुझ्या बहरात दे

चेहर्‍यांच्या भोवती भिंती उभ्या
ओळखीचा शब्द या शहरात दे

संपतो काळोख , हा येते उषा
ठेव तू विश्वास , हाती हात दे
     (मंगेश पाडगावकर)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

गाणे ओळखा - ७

ही कोणती स्थिती?
ही कोणती दैव करूणा?
जिथे नजर जाई
तिथे धूळ च धूळ वाही

हे कसे आयुष्य मला घेऊन फिरते
ना आनंदाने भरूनी जाते
ना दुःख नमवून ठेवते

- सौ. मृणाल पाटोळे 

12/01/2016, 18:02 - सौ. पाटोळे मृणाल सुभाष: ओळखा ..
12/01/2016, 18:03 - सौ. पाटोळे मृणाल सुभाष: जमते आहे ...हिंदी गाण्यांचे मराठी भाषान्तर😄
12/01/2016, 18:03 - प्रशांत दांडेकर: Ye kya jagah hai doston umraojaan
12/01/2016, 18:04 - सौ. पाटोळे मृणाल सुभाष: 👏👏👏

गाणे ओळखा - ६

जगण्याच्या या प्रवासात जे
टप्पे निघून जाती...

पुन्हा कधी ना येती , फिरुनी
पुन्हा कधी ना येती...

- डॉ. अमेय गोखले


12/01/2016, 18:01 - प्रशांत दांडेकर: Jindagi ke safer me gujar

गाणे ओळखा - ५

फुलांचे रंग अन हृदयाचा बोरु
पत्र तुला एक धाडले
मग काय नाहीअन काय करू
क्षणा क्षणाला तू छळले

- निवेदिता दांडेकर


12/01/2016, 17:43 - Nivedita Khandekar: Literal translation ....
12/01/2016, 17:43 - Nivedita Khandekar: 😵😷
12/01/2016, 17:44 - सुचिकांत: फुलो के रंग से
12/01/2016, 17:44 - सुचिकांत: दिल कि कलम से
12/01/2016, 17:44 - सुचिकांत: ??
12/01/2016, 17:44 - Vaishali K: 👍🏻👍🏻
12/01/2016, 17:46 - Nivedita Khandekar: बरोबरच आहे

गाणे ओळखा - ४

दगाबाज मी नसूनसुद्धा
प्रेम निभावू शकलो नाही...

मला मिळाली शिक्षा त्याची
गुन्हाच जो मी केला नाही...

- डॉ. अमेय गोखले


12/01/2016, 17:31 - Nivedita Khandekar: हम बेवफा हरगिज़ ना थे ... पर हम वफ़ा कर ना सके
12/01/2016, 17:31 - Nivedita Khandekar: ??
12/01/2016, 17:31 - Amey gokhale: 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
12/01/2016, 17:31 - Amey gokhale: बरोबर

गाणे ओळखा - ३

काट्यांवरुनी पदर ओढुनी
बंधनातले नूपुर तोडुनी.....

आज पुन्हा जगण्याची आशा ,
आज पुन्हा मरणाची भाषा.....


- डॉ. अमेय गोखले


12/01/2016, 17:09 - Vaishali K: कांटों से खींच के
12/01/2016, 17:09 - Amey gokhale: जुन्या हिंदी गाण्याच्या ओळींचं भाषांतर
लतादीदींचा स्वर...
12/01/2016, 17:09 - सुचिकांत: गाईड
12/01/2016, 17:09 - Amey gokhale: 😝😝😝




गाणे ओळखा २

तुझ्या आणि माझ्यमध्ये आज झाली
सखे तारकां एवढी अंतरे...
कधी एक वाटेवरी साथ केली
कसे आज वाटेल कोणा खरे...

- अमेय गोखले 

प्रतिसाद :

11/01/2016, 22:47 - Amey gokhale: <Media omitted>
11/01/2016, 23:10 - Aniket Pardeshi: अमेय सर 👌🏼👌🏼
11/01/2016, 23:14 - Vaishali K: अमेय सर👌🏻👍🏻 पण ओळखायला अवघड
11/01/2016, 23:14 - सुचिकांत: अमेय सर .. तुम्हीच सांगा ..
11/01/2016, 23:16 - सौ. पाटोळे मृणाल सुभाष: जुने की नवे ??
11/01/2016, 23:16 - Vaishali K: किंवा काही खूण सांगा
11/01/2016, 23:16 - सौ. पाटोळे मृणाल सुभाष: हो
11/01/2016, 23:17 - Rahul Tokekar: <Media omitted>
11/01/2016, 23:17 - Nivedita Khandekar: जाने वो कैसे ... चं स्वैर
11/01/2016, 23:18 - Nivedita Khandekar: ?


उत्तर :- 

Amey gokhale: हमारी राहों के बीच अब तो
सदियों के फासले है...
यकीन होगा किसे के हम तुम
इक राह संग चले है...

गाणे ओळखा

जिवा मैत्र ना मिळे हो।दुःखभारी अंतरी।
नसे जिवा मोद ,घरी वा बाहेरी।
कधि मन विहारी नभी वा महीवरी।
शोधले  कुठे कुठे तुला मी।
बहुत दिन मन हे आसावले।,
अन् प्रीतिने भारावले।
परि नच मिळे मैत्र जिवाचे
असे दुःख हे अंतरी॥२॥
मम प्रीतिला मीच मग समजावले मैत्र जिवाचे कधीच ना मिळणार,
परि सांजवेळी प्रीतिचादीप मी लावेन।
जिवामैत्र ना मिळे हो। दुःख भारी अंतरी।।३॥



|| झाड ||

|| झाड ||

एक होते झाड
त्याला आली फूले फार
फुलांचा सुटला घमघम वास
केसात लाऊ फूले खास

वेलीला आली फूले फार
त्यांचा करू छान सा हार
देवाला वाहून करू नमस्कार

झाडाला आले आंबे फार
त्यांचा करू छान सा खार
 डब्यात नेऊ मॅडम ला खार

एक होते आवऴाचे झाड
त्याला आले आवळे फार
आवळ्याची केली सुपारी
सर्वाना देऊ खायला दुपारी

कु.प्रियंका पंडीत
वर्ग 3 रा
जि प म प्रा कन्या शाळा ,
सिनगाव प. स.
देऊळगावराजा ,जि .बुलढाणा
🙏🙏🙏🙏🙏🙏

जन्म मानवाचा

या जीवसृष्टीमध्ये माणसाला जर कशाने वेगळेपण प्राप्त झालं असेल , तर ते विचारशक्तीमुळे ; आणि आपले विचार व्यक्त करण्याच्या सामर्थ्यामुळे !!! आणि मुळात माणसाला या सर्व गोष्टी शक्य होतात , त्याच्या मनामुळे…

आजच्या विज्ञान युगात जन्म-पुनर्जन्म , मोक्ष , अवतार या संकल्पनांवर प्रत्येकाचाच विश्वास असतो असं नाही. विश्वास ठेवायची गरज आहे असंही मला वाटंत नाही. पण या पलीकडे निदान आपण स्वतःपुरता practical विचार केला , तर आपण एक गोष्ट स्वतःला विचारू शकतो , की ' खरंच माणसाचा जन्म मिळून आपण काय केलं ? '

'कोट्यवधी जगतात जिवाणू , जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती'

हे या जीवसृष्टीचं वास्तव आहे. या असंख्य जीवजंतूं प्रमाणेच आपणही जन्माला आलो , जगलो आणि कालांतराने मरून गेलो ; तर आपल्यात आणि त्या जीवजंतूंमध्ये फरक तो काय ? आपण आपल्या आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे , की ज्याचा कुणाला तरी 'चांगल्या अर्थाने' उपयोग होईल !!! तरच खर्‍या अर्थाने आपल्या जन्माचं सार्थक होईल.

मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपले सर्व क्रियाव्यापार मनाच्या अखत्यारीत येतात.
म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात ,

' देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी |
मना सज्जना हेची क्रीया करावी ||
मना चंदनाचेपरी त्वां झिजावे |
परी सर्व लोकांसी रे नीववावे || '

पण , मित्रहो . . .
हे सगळं एकदम आदर्शवत् वाटतं ना !!!

प्रत्यक्षात सगळीच माणसं काही संत नसतात ना !!!
आयुर्वेदानुसार सत्व , रज आणि तम हे मनाचे तीन गुण आहेत.
तीनही गोष्टींच्या कमी-अधिक प्रमाणानुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव बदलतो. आणि वास्तवातही हेच बघायला मिळतं.  आजच्या काळात तर माणूस फक्त स्वतःपुरताच विचार करायला लागलाय ! त्यामुळे सहाजिकच मानाच्या गुणांपेक्षा दोषच वाढायला लागल्येत… लोभ , ईर्ष्या , द्वेष , मत्सर , क्रोध हा मानस दोष आहेत. आणि आज आपण फक्त आणि फक्त हे दोषच जोपासतोय…

तटस्थपणे 'माणूस' या सामन्य संकल्पनेचं आजचं विवरण करायचं म्हटलं , तर आपल्याला काय दिसतं ?????
वाटल्यास आपण आध्यात्मिक किंवा मीमांसक भाषा बाजुला ठेवून प्रत्येकाला पटेल अशा साध्या सोप्या भाषेत विचार करू !!!!
काय असतं आपलं आयुष्य ? माणसाला कळायला लागल्या पासून त्याची इतरांशी स्पर्धा सुरू होते. स्पर्धा म्हटली की हार-जीत आली , तुलना आली… तुलना झाली की ईर्ष्या आली. त्यातून द्वेष , निराशा ; स्वार्थीपणात वाढ , बदल्याची भावना…… हे सगळं दुष्टचक्र आपोआपच सुरू होतं. आणि आपण आपल्या मनाच्या चांगल्या गुणांपेक्षा वाईट गोष्टीच वाढवत असतो.

-----x-----x-----x-----x-----x-----

एखाद्या माणसाने आपलं आयुष्य फक्त दुसर्‍यांना मदत करण्यासाठी घालवायचं ठरवलं , तरीही आयुष्य कमी पडेल अशी सध्याची परिस्थिती आहे. मग ते निसर्ग संवर्धन असो , इतर प्राणीमात्रांची सेवा असो किंवा समाजातील गरजू माणसांना मदत करणं असो… करणार्‍याला चांगल्या कामांची कमतरता नाही.


पण माणूस प्रत्यक्षात काय करतो ? माणूस केवळ स्वतःसाठीच जगतो. आत्मकेंद्री स्वभावामुळे दुसर्‍याची अवहेलना करतो. गर्व करतो. पण , या आत्मकेंद्री विश्वातच जर जगायचं असेल , तर त्या माणसाचा जन्म व्यर्थ आहे. माणसाला नेहमी असंच वाटंत असतं , जगात मीच एकटा शहाणा… म्हणूनच आपण नेहमी इतरांच्या चुका काढत असतो. काहीजण आपण मोठे दानशूर किंवा समाजसेवक असल्याचा आव आणतात . प्रत्यक्षात मात्र , कुणावर उपकार करण्याची वेळ आल्यावर असे लोक काहीतरी कारणं सांगून तेथून पळ काढतात. अशा प्रकारे स्वतःला सज्जन म्हणवून घेणार्‍या , परंतू  उक्ती आणि कृतीत फरक असणार्‍या माणसांचा जन्म व्यर्थ आहे !!!!!

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो. प्रत्येक चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आत्मकेंद्री स्वभावामुळे असे लोक इतरांना दुय्यम वागणूक देतात. यापैकी बर्‍याच जणांचा आविर्भाव तर असा असतो , की जणू काही हा राजा , आणि बाकीचे लोक त्याचे नोकरच आहेत !!!!! अशा लोकांपेक्षा इतर कुणी थोडी जरी प्रगती केली , तरी यांचा जळफळाट होतो. थोडक्यात काय , तर अंगी असलेल्या ज्या काही थोड्याफार चांगल्या गोष्टींमुळे हे लोक माजलेले असतात , ते so called सद्गुण त्यांच्या वागणुकीमुळे काहीच उपयोगी नसतात. अशा माणसांचा जन्मही व्यर्थच आहे !!!!!

आपण जरा जरी आसपासच्या निसर्गाचं निरीक्षण केलं , तरी परोपकार म्हणजे काय , हे आपल्याला शिकता येईल !!!

' परोपकाराय फलन्ति वृक्षाः | परोपकाराय वहन्ति नद्यः |
परोपकाराय दुहन्ति गावः | परोपकारार्थमिदं शरीरम् || '

असं एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजेच , झाडं इतरांना फळं , फुलं , सावली  आणि बरंच काही देतात… नदी आपल्या पाण्याने जगाचं पोषण करते… गाई आपलं दूध विना तक्रार माणसाला काढू देतात… आणि माणूस मात्र आपल्या नातलगांनाही आपला फायदा होऊ देत नाही... मग अशा माणसाचा , माणूस म्हणून जन्म व्यर्थच नाही का……..


मित्रहो , याच विषयावर माझी एक कविता आहे… ती सोबत शेअर करत आहे...
हा ब्लॉग आणि ही कविता दोन्ही गोष्टी आपणाला कशा वाटल्या , ते नक्की कळवा…

© डॉ. अमेय गोखले ,
   रत्नागिरी.
9422662772.

गझलची तोंड ओळख - भाग ११

📝 गझलची तोंड ओळख - भाग 11 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          स्रग्विणी

🎶 एकूण मात्रा : 20

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
2  1  2   2  1  2  2  1  2  2  1 2
= 20

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो ?

ते सुखासीन संताप गेले कुठे ?
हाय जा तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे , तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी , स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी ?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो
              (सुरेश भट)


जे घडाया नको , तेच कैसे घडे ?
चालताना कसा , पाय माझा अडे ?

चेहरा कोणता ? मुखवटा कोणता ?
ओळखावे कसे , प्रश्न मोठा पडे

हुंदका दाबुनी , न्याय व्हावा कसा ?
ऐनवेळी असे , सत्य कोठे दडे ?

धर्म रंगांधळा , जातही पांगळी
का तरी पाडती , भावनांना तडे ?

घेउनी टाक हे , शब्द माझे तुला
अन्य काही नसे , दान माझ्याकडे
     (कवी डॉ. अमेय गोखले)


जिंकलो मी तरी , हार झाली कशी ?
आतली ही फुले , ठार झाली कशी ?

धावलो धावलो , खेचले श्रेय मी
जिद्द माझी मला , भार झाली कशी ?

घोषणा भोवती , पूर यावा तशा
वेदनेने मुकी , तार झाली कशी ?

तारकांनी पुन्हा , साद नाही दिली
रात्र प्राणांवरी , स्वार झाली कशी ?

आतली पोकळी , गाजवी मालकी
तीच कंठावरी , वार झाली कशी ?
         (मंगेश पाडगावकर)


जीव माझा मला , संकटासारखा
मी तरीही जगे , लोचटासारखा

काय शंका तुला , मी विचारू नये ?
मी म्हणे बोलतो , उद्धटासारखा

पत्थरासारखा , ऐकणारा मिळे
बोलणारा मिळे , पोपटासारखा

जे मला भेटले , ते असे भेटले
हा नटासारखा , तो कटासारखा

हेच माझे तुझे , एक नाते खरे
तू समुद्रापरी , मी तटासारखा

बोल काहीतरी , भेट झाल्यावरी
काय प्रारंभ हा , शेवटासारखा ?
             (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

Sunday 10 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग १०

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 10 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          आनंदकंद

🎶 एकूण मात्रा : 24

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
 2  2  1  2  1  2  2  2  2  1  2  1  2  2
= 24

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


केव्हतरी पहाटे , उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात्र गेली

उरले उरात काही , आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे , उचलून रात्र गेली

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात्र गेली
                  (सुरेश भट)


गाण्यात सर्व माझ्या , माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे , तो बेइमान आहे

येता समोर दुःखे , तो षड्ज झेलला मी
काट्यावरी स्वरांची , झुलती कमान आहे

झाडांत पावसाच्या , बेहोश आरतीला
वाजे मृदुंग तेथे , माझाच प्राण आहे

का वेदनेत होतो , हा जन्म साधनेचा ?
रेषाच संचिताची , ही बेगुमान आहे

आयुष्य पेटताना , ओठांत सूर होता
हे सोसणे सुराला , माझ्या प्रमाण आहे
            (मंगेश पाडगावकर)


अश्रु कधीच आता , मी ढाळणार नाही
संकेत या जगाचे , मी पाळणार नाही…

कोणी नसे कुणाचे , साराच हा दिखावा
इथल्या प्रलोभनांना , मी भाळणार नाही...

माझेच कष्ट सारे , अन् श्रेय हे कुणाला
हा घाम वंचनेचा , मी गाळणार नाही...

मीही जगेन आता , माझ्या मनाप्रमाणे
या कोवळ्या मनाला , मी जाळणार नाही...

शिकवू नये कुणीही , मी ओळखून आहे
माझी जबाबदारी , मी टाळणार नाही...
            (कवी डॉ. अमेय गोखले)


डोळ्यांत सांजवेळी , आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना , सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले , असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू , माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या , शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची , माती इथे निशाणी

सौदा इथे सुखाचा , पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा , ही माणसे शहाणी

कळणार हाय नाही , दुनिया तुला-मला ही
मी पापण्यांत माझ्या , ही झाकली विराणी
              (मंगेश पाडगावकर)


येतात मुख्यमंत्री , जातात मुख्यमंत्री
मिळतात सर्व अंती , मसणात मुख्यमंत्री

पाहू चला "मराठी अवतार" मोगलांचे
हल्ली म्हणजे 'टग्यांना' , म्हणतात मुख्यमंत्री

गर्दी नको , खिसेही आपापले तपासा
गेले म्हणे इथूनी , इतक्यात मुख्यमंत्री

जेव्हा "समान संधी" , यांना मिळेल तेव्हा
होतील सात एका , हप्त्यात मुख्यमंत्री

सांगू नये कुणीही , कोणास पथ्यपाणी
जे काय खायचे ते , खातात मुख्यमंत्री

जे आमदार त्यांना , समजू नका शिपाई
रांगेमधील तेही , 'अज्ञात' मुख्यमंत्री

कोणास काय ठावे ? 'वंशीच' त्या काळावे
होऊ नकोस बाबा , जन्मात मुख्यमंत्री
                  (सुरेश भट)


हे वेगळेच रस्ते , ही वेगळीच नाती
शहरात माणसांना , ही माणसेच खाती

इथल्या इमारतींना , आकाश ठेंगणे हे
सर्वत्र तक्षकांच्या , या माजल्या जमाती

रस्त्यावरी उपाशी , हे मूल माणसाचे
घाईत माणसे ही , बघती , निघून जाती

येथील भक्षकांना , गणवेश रक्षकांचे
अन् बेरकी लुटेरे , नेतेपणात न्हाती

गर्दीत राहुनीही , परकेपणा न संपे
येथे मुकेच सारे , बहिर्‍यांसमोर गाती
           (मंगेश पाडगावकर)


विश्वात माझिया या , हरवून चाललो मी
नाते दुज्या जगाशी , विसरून चाललो मी

गुंत्यात गुंतताना , ना भान राहिले अन्
माझ्या मनात गुंता , रुतवून चाललो मी

माझ्या मनात होते , आभास ज्या स्वराचे
अवघ्या जगामध्ये तो , शोधीत चाललो मी

अव्यक्त भावनांना , देऊन शब्दरूपे
समजूत या मनाची , काढीत चाललो मी

चित्तास जाहला जो , संताप या जगाचा
उन्मत्त या जगाला , तुडवीत चाललो मी
            (कवी डॉ. अमेय गोखले)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ऑनलाईन वाचनकट्टा

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
➖➖➖➖➖➖➖➖

उपक्रम :- ऑनलाईन वाचन कट्टा

💡पुस्तक - लोक माझे सांगाती
💡लेखक - मा. शरद पवार
💡प्रकार - आत्मकथन, राजकीय
💡प्रस्तावना
# माझे बाबा, माझे हिरो
# सुप्रिया सुळे
💡वाचक - सुचिकांत वनारसे


 =======================
थोडं वेगळं.
वात्रटिका:
💡मालिका: होणार सून मी
💡प्रसन्न कुलकर्णी
💡शिरिष फडणीस


 =======================

💡मराठी मेवा - दिवस दहावा
💡ललित : सूर्याचे दूरदर्शन
💡लेखन आणि वाचन : प्रीति कामत तेलंग

 =======================

💡मूळ साहित्यकृती:मराठीची बोलु कौतुके
💡लेखक/कवी:श्रीरंग विष्णू जोशी
💡प्रकार - कविता
💡कविता:आईची कविता
💡वाचक - मृणाल पाटोळे

 =======================

💡अंतर्नाद..मासिक..एप्रिल २०१३ चा अंक..
💡"कथा एका ध्येयसाधनेची"....
💡वाचक सौ.वृषाली गोखले..

 =======================

💡पुस्तक -- गजकथा
💡लेखक -- निनाद बॆडॆकर
💡कथा -- चित्तॊडचा रणसंग्राम
💡वाचक - नीलिमा कार्लॆ

========================

💡पुस्तक -- बिंदूसरोवर
💡लेखक -- राजेन्द्र खेर
💡प्रकरण -- १
💡वाचक - निवेदिता खांडेकर

========================

💡पुस्तक - तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
💡सद्गुरू वामन पै
💡वाचक - अनिता जावळे



========================

💡पुस्तक-किशोर मासिक                  
💡कथा-तु माझी आई आहेस काय?                    
💡लेखक-पी.डी.ईस्टमन,मराठी अनुवाद-प्रा.पृथ्वीराज तौर                    
💡वाचक-श्रीमती विजया पाटील

मराठी मेवा

मराठी मेवा - दिवस नववा -क्रमांक ९
आज ऐकुया काव्यवाचन ….

आमची आई स्वतः सिद्धहस्त शीघ्र कवयित्री आहे. बालकविता, प्रेमकविता यांसोबतच तिने रचलेल्या काही विचारनिष्ठ मुक्तकविता देखील वेळोवेळी विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असतात.

तिच्या अशाच मुक्तकवितांपैकी ‘अनंतकाळची माता’ ही एक कविता २०१४ च्या संस्कारदीप दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. ती फार गाजली देखील.

आज तीच कविता तुम्हाला ऐकवताना पुनर्भेटीचा आनंद होतोय.

कविता : अनंतकाळची माता
कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत
काव्यवाचन: सौ. प्रीति कामत तेलंग




गझलची तोंड ओळख - भाग ९

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग ९ 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          सौदामिनी

🎶 एकूण मात्रा : 18

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
1  2  2  1  2  2  1  2  2  1  2
= 18

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


तुला लाजलेली अशी पाहतो
सुखाच्या सुगंधात मी नाहतो

जराशी लवे बावरी पापणी
फुलांचे उरी बाण मी साहतो

झुरे शब्द ओठात ओलावला
अनोखा सुगावा मला बाहतो

तुझ्या भोवती धुंद वारा फिरे
वसंतातली आर्जवे वाहतो

कशी नीज माझी फुलांनी भरे ?
फुलांच्याच स्वप्नात मी राहतो
      (मंगेश पाडगावकर)


उद्या व्हायचे ते अता होऊ दे
कुठे काय माझे अडे ? जाऊ दे…

कुणी निंदतो वा कुणी वंदतो
कुणाचे कुणी गोडवे गाऊ दे

मला काय त्याचे , जगो वा मरो
उपाशी मरो वा किती खाऊ दे

उपेक्षा सदाचीच आम्हा मिळे
कुणाचीहि सत्ता इथे येऊ दे

कुणी काय माझे भले पाहिले ?
खरे सूख माझे मला पाहू दे
  (कवी डॉ. अमेय गोखले)


मनी तुंबुनी भावना दाटली
कधीचीच चप्पल असे फाटली

नसे एकही येथ मोची कुठे
किती घासुनी वाट मी काटली

कसा बंध फोडून जाऊ बरे ?
पिचे बर्गडी , मोडते वाटली !

खिसा फाटल्या जीर्ण वस्तीत या
दुकाने नवी ही कुणी थाटली ?

दिले सर्व भाडे विनापावती
अशी थोर खोली इथे गाठली
      (मंगेश पाडगावकर)


मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले

लपंडाव माझातुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले

तुझ्या अंतरी कोणती वादळे ?
मला हेलकावे बसू लागले

तुझी पाहता पाकळीपाकळी
गडे , पाहणेही फसू लागले

अशी ही कशी तीच ती उत्तरे ?
मला प्रश्न माझे हसू लागले

कुठे संपल्या रोजच्या यातना ?
पुन्हा हे दिलासे डसू लागले

कसा मी रडू ? हे कसे लोकही ?
स्वतःचेच डोळे पुसू लागले
            (सुरेश भट)


किती माणसे ही , किती माणसे ?
कडू धूर काळा पिती माणसे

दुपारी असे ओस रस्ते कसे ?
भिती माणसे ही , भिती माणसे

झुले झुंड , पुंगी कुणी वाजवी
कशी मी म्हणू ही जिती माणसे ?

चढे घोष , गोंगाट यांची नशा
रिती माणसे ही , रिती माणसे

किड्यांचेच हे भोग , संभोग हा
विती माणसे ही , विती माणसे
      (मंगेश पाडगावकर)


कधी प्राण गेला असे वाटते !
कधी भास झाला असे वाटते !

कसा काय काळोख तो संपला ?
उजेडास भ्याला असे वाटते !

कुठे मूक मोर्चा पहा कालचा
मुक्यानेच मेला असे वाटते !

पुन्हा तोच कैदी पळाला कसा
छुपा डाव केला असे वाटते !

इथे आज क्रांती कशी जाहली ?
नवा रोग आला असे वाटते !
  (कवी डॉ. अमेय गोखले)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

वेळ अमावस्या

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹वेळ अमावस्या🌹

अमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र), अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”. येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द. अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे नामकरण हे 'वेळ किंवा येळ अमावस्या' असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.

 “हुलगे हुलगे-पावन पुलगे”

“ होलग्या होलग्या-सालन पलग्या”

“हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला”

“चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला “ या व अश्या ऊचाराने शिवार दुमदुमून जात.

दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना,मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.
            शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात. सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.  शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते. मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते. दिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा, वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच पिकांची देखील पुजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते. सुगड्यामध्ये आंबिल ठेवलेले असते. पुजेनंतर सर्व शेतात चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला असे म्हणत ज्वारीच्या पानाने आंबिल शिंपडली जाते. ज्वारीच्या रानात चार पाच पाच दहाटाला एकत्रित करून एखादे वस्त्र गुंडाळून फळाफळांवळसह लक्ष्मीची आईची ओटी भरून नैवेद्य दाखविला जातो.
            हा सण, ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो .
.
🔸 आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका 'बिंदग्यात' (माठ) भरून ठेवलं जात. आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच 'नशा' असते. केवळ आंबिलावर हा बेट थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थ!  या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली 🔸भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि
आंबट भात , गोड भात, साधा भात
! खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते. उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गूळ, रस हाही आनंद उपभोगता येतो. असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो. शिवारभर फेर-फटका मारण, मधाचे पोळे झाडण,पत्ते खेळण या व अश्या अनेक उपक्रमांसह निसर्ग पर्यटनाचा खरा आनंद घेतला जातो.
सध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.
एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.
वेळ अमावास्येला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते; अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्‍या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.
उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.
शेतीची निर्मितीक्षमता वाढविण्यासाठी कितीही वैज्ञानिक प्रयोग केले तरी ऊन, वारा, पाऊस या सर्वाची साथ हवी. पर्यावरण नीट रहावे यासाठी एका मोठय़ा शक्तीसमोर नतमस्तक व्हायला हवे यासाठीचा हा उत्सव आहे.
शेतीत उत्पादित होणाऱ्या सर्व बाबींची पूजा करणे म्हणजेच लक्ष्मीची पूजा करणे हा अर्थ घेऊन शेतात कोप करून त्यात मातीने लक्ष्मीची प्रतिमा तयार केली जाते व त्याची पूजा होते. शेतातील पांडवांची , मंसोबाची , मारोती  पूजाही त्या दिवशी आवर्जून केली जाते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबिलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून ‘हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला’, असे म्हणत तो सर्व शेती फिरतो.
         
 तर मग या आमच्या शेतात भज्जी खायला आणि अंबील प्यायला!!!!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

- धनंजय रेड्डी'


जापनीज व्यवस्थापन

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
➖➖➖➖➖➖➖➖

🎎जापनीज व्यवस्थापन🎎

जपानी लोक हे उद्योगप्रिय, शिस्तप्रिय, वेळेचे बंधनकाटेकोरपणे पाळणारे व त्याच बरोबर व्यवस्थापनाचेवेगवेगळे फंडे राबविणारे लोक आहेत. कायझेन,मानेजमेंट (management) बाय वॉक ह्या शब्द संज्ञात्यांचीच देणगी आहे.  आज आपण बघणार आहोतमेनेजमेंट (management) बाय वॉक ही संकल्पना.

जपानमध्ये बऱ्याच बस स्टोप (stop) वर खालीलसुविचार लिहिलेला असतो. इथे फक्त बसेस थांबतात पण आपला अमुल्य वेळ मात्र नाही. तेव्हा आपले ध्येय गाठण्यासाठी चालत रहा. किती सुज्ञ विचार आहे ना!. आपले ध्येय गाठण्यासाठी जर साधने उपलब्ध नसतील तर एकाच जागी खिळून राहू नका, पुढे चालत रहा. ध्येय गाठण्याच्या मार्गावर निरंतर चालत रहा,साधन कधीना कधी वाटेत मिळतेच

हा विचार मानेजमेंट (management) बाय वॉक चा सुंदर अविष्कार आहे.व्यवस्थापन फंडा हस्तिदंती मनोऱ्यात बसूनच राबवायचे नसतात तर सहज पणे कंपनीमध्ये / शॉप फ्लोअर मध्ये चालता चालता देखील राबवायचे असतात

एकदा सुप्रसिद्ध ताज हॉटेल मध्ये मी. मसाई यांचे व्याख्यान ठेवले होते. विषय होता - अनुत्पादक खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करणे. मसाई यांच्या व्याख्यानासाठी अलिशान हॉल राखून ठेवण्यात आला होता. मसाई यांना ऐकण्यासाठी हॉल तुडुंब भरला होता.त्यांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला पण मसाई शांतपणे म्हणाले, " स्वागताबद्दल धन्यवाद पण माझे व्याख्यान बंद हॉल मध्ये कसे होणार? कारण इथे तर कोणतेच काम दिसत नाही आहे. त्यामुळे आपण कामाच्या ठिकाणी जाऊ व तेही चालत”

मसाई यांनी सुरुवात केली ते पहिल्या मजल्यावरील कॉर्नर च्या पहिल्या खोलीपासून. ती खोली म्हणजे लौंड्री रूम होती.  उघड्या खोलीतून वाऱ्याची छान झुळूक येत होती. समोर मावळत्या सूर्याचे मनमोहक दर्शन होत होते. हे सर्व अनुभवल्यावर मसाई म्हणाले हि लौंड्री रूम इथून हलवा व तळमजल्यावर न्या. ही रूम एखाद्या अतिथीला द्या व बक्कळ नफा कमवा. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीतील पोटेन्शियल ओळखू शकत नाही व त्याचे आपण अंडर युटीलायझेशन करतो मग ती वस्तू असो कि माणूस

मसाई आता पुढच्या खोलीकडे वळले होते. ती खोली म्हणजे रेस्तोरंट ला लागून असलेली बेसिन होती. त्या बेसिन मध्ये असंख्य महागड्या प्लेट्स, काचेचे ग्लास एकावर एक पडले होते. ते सर्व धुण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर शेजारच्या कपाटामध्ये धुतलेले ग्लास, प्लेट्स व चमचे ठेवले होते. कपाट पाऊण एक भरले होते. हे पाहून मसाई खूप वैतागले. ते म्हणाले हा शुद्ध पैशाचा दुरुपयोग आहे. सर्वात आधी कपाटामधील अर्धे एक कटलरी सामान स्वच्छ पुसून, पेकेजिंग करून बाजूला ठेवून द्या नाहीतर दुसऱ्या ठिकाणी जिथे त्यांची खरोखर गरज आहे तिथे पाठवून द्या. कपाटात सामान कमी असल्याने वापरातले प्लेट्स, कप, ग्लासेस वेळच्या वेळी धुणे आवश्यक होऊन बसेल. त्यामुळे खरकट्या भांड्यांचा पसारा दिसणे कमी होईल व त्याच सोबत एकावर एक पडून असलेला ढीग कमी झाल्याने कटलरी तुटण्याची फुटण्याची शक्यता कमी होईल व नुकसान देखील. जपानी भाषेत 'मुदा' म्हणजे अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर दिला जातो. पैशाची विपुलता व त्यामधून येणारी बेफिकरी खूप नुकसान करते.  मसाई यांचे बोलणे चालूच होते. दुसऱ्या ठिकाणी वस्तू पाठवून दिल्याने त्यांचा देखील नवीन खरेदीवरील खर्च वाचेल. यालाच तर ऑपरेटिंग कोस्ट कंट्रोल म्हणतात. सर्वांनाच मसाई यांचे मेनेजमेंट (management) बाय वॉक कळत पण होते व वळत पण होते

मसाई म्हणाले तुम्ही कामाच्या जागी फेरफटका मारला तर तुमचे कुठे काय चुकत आहे ते सहज कळेल. मसाई म्हणाले, “एकदा माझा मित्र त्याच्या अमेरिकन मित्राबरोबर गावाबाहेर च्या जंगलामध्ये मोर्निंग वॉक ला गेला होता. रस्त्याच्या कडेला कार उभी करून, दोघे मित्र हायवे च्या कडेला असलेल्या सर्व्हिस रोड वर वॉक करू लागले. चालता चालता संभाषणाचा विषय होता.. गळेकापू स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल कसे पुढे ठेवायचे. बोलता बोलता दोघे मित्र मुख्य रस्ता सोडून जंगलामध्ये शिरले. काही अंतर कापल्यावर जेव्हा त्या दोघांना वाघाची डरकाळी ऐकू आली तेव्हा ते भानावर आले. अमेरिकन मित्र जापनीज मित्राला म्हणाला, "मित्रा, चल पळूया इथून. वाघ येण्याआधी मुख्य रस्त्यावर लागू व आपल्या गाडीत बसू" असे म्हणून अमेरिकन पळायला देखील लागला. जरा वेळाने त्याने पाठी वळून पहिले तर जापनीज मित्र अजून हि बुटाची सुटलेली नाडी बांधत होता. हे पाहून अमेरिकन मित्र म्हणाला, "अरे बूट काय बांधत आहेस, पळ आधी" त्यावर जापनीज मित्र म्हणाला," मित्रा जीव वाचविण्यासाठी मला गाडी पर्यंत पोहचण्याची गरज नाही, पळताना तुझ्या पुढे एक पाऊल राहिलो तरी पुरेसे आहे. व ते एक पाऊल पुढे राहण्यासाठीच मी बुटाची सुटलेली नाडी घट्ट बांधत आहे" हे ऐकून अमेरिकन मित्र ओशाळला. त्याला हे कळलेच नाही कि वाघाने जर एकाला पकडले तर दुसऱ्याला पुढे धावण्याचीच गरज लागणार नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी कार गाठणे जरुरी नाही. जापनीज मित्राने त्या आणीबाणीच्या प्रसंगी देखील स्पर्धेत टिकून राहण्याचा महामंत्र आपल्या अमेरिकन मित्राला सांगितला होता.

कधी कधी जेव्हा आपण अचानक समोर आलेल्या पेचप्रसंगामुळे घाबरलेलो असतो तेव्हा आपण सारासार विचारशक्ती हरवून बसतो. आपण सोपी युक्ती शोधण्याऐवजी क्लिष्ट उपाय शोधण्यामध्ये आपली शक्ती वाया घालवितो. अशावेळी खरेतर गरज असते ती फक्त एक पाऊल इतरांपेक्षा पुढे राहण्याची

- प्रशांत दांडेकर

Saturday 9 January 2016

मराठी मेवा

मराठी मेवा - दिवस आठवा - क्रमांक ८
बालकथा: पराक्रमी गंपू
( लोकसत्ता - रविवार वृत्तमानस मधून साभार)
लेखक : विनायक कुळकर्णी
कथाकथन: प्रीति कामत तेलंग

गझलची तोंड ओळख - भाग ८

📝 गझलची तोंड ओळख - भाग 8 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
        मालिबाला

🎶 एकूण मात्रा : 19

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2
= 19

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


आज हे आभाळ आहे दाटले
खूप बोलावे तुझ्याशी वाटले

वृक्ष हे घायाळ पक्ष्यांसारखे
प्राक्तनाने पंख ज्यांचे छाटले

कापरे निःश्वास तैसे दैव हे
खोल या डोहात काजळ साठले

मूक हे प्रत्येक येथे पाखरू
आतले गाणे जसे की आटले

सोडिले आहे फुलांनी गाव हे
एकही नाही कुठेही भेटले
     (मंगेश पाडगावकर)


निर्दयांनो , हात कोणा लावता ?
कायद्याचा धाक कोणा दावता ?

माज हा तुम्हा कशाचा जाहला ?
आमुच्या शिक्क्यात तुम्ही मावता

'पाच वर्षे' काढुनी झोपा पुन्हा
आमच्या मागे कशाला धावता ?

आमुची सत्ता तुम्हाला पाहिजे
ती तशी मिळता अम्हाला चावता !

अर्धपोटी राहते जनता इथे
अन् कसे मस्तीत तुम्ही जेवता ?

जो तुम्हा नियमीत देई 'पाकिटे'
त्या बड्या धेंडास तुम्ही पावता

सर्वसामान्यास होती साह्य ज्या
मागण्या ऐकून तुम्ही कावता !

जनहितासाठी कुणी देता लढा
नेमके लफड्यात त्याला गोवता.....
    (कवी डॉ. अमेय गोखले)


एक खोली फक्त खाली पाहिजे
इंद्रियांची सोय झाली पाहिजे

नागव्यांची कोण वस्त्रे फेडतो
प्राक्तनाची माय व्याली पाहिजे

देवळांनी गुंड सारे पोसले
देवही आता मवाली पाहिजे

मोडुनी खाऊन झाला देश हा
प्रेतयात्राही निघाली पाहिजे

ऊर बडवाया पुढारी सज्ज हे
झुंडही भरपूर आली पाहिजे

मी स्वतःला पाहतो आहे विकू
मात्र साजेशी दलाली पाहिजे
       (मंगेश पाडगावकर)


लागले डोळे तुझे माझ्याकडे
अन् इथे मी मोजतो माझे तडे

शोधिती मागे पिशा वाटा मला
ही तुझी जाणीव पायांना नडे

तू उन्हाची कोवळी भोळी कळी
का तुला अंधार माझा सापडे ?

हे तुला रेशीम प्राणांचे दिले
बांध माझ्या वेदशांचे केवडे

मी कधीचा संपलो आहे तरी
आज का चिंता तुला माझी पडे ?
            (सुरेश भट)


आशयाला कूस द्यावी वाटले
शब्द सारे जन्मताना फाटले

ज्ञानही भ्रांतीत अंती पोचले
हुंदके काळे गळ्याशी दाटले

शेपटीने बांधलेल्या तंगड्या
सर्व मी माझे उमाळे छाटले

कोंबडीवर कोंबडा घेतो उडी
पंख केवळ याचसाठी ताठले

आतुनी गेलो दुभंगुन मी पुरा
क्षीण होते ते झरेही आटले
     (मंगेश पाडगावकर)


संकटांना तोंड देणे वेगळे
अन् भयाने दूर जाणे वेगळे...

पाहुनी अन्याय तू द्यावा लढा
भेकडांनी मार खाणे वेगळे...

काळजाचा ठाव घेती शब्द जे
वीरतेचे गीत गाणे वेगळे...

देशकार्याच्या रणी बेभान व्हा
'झिंगुनी बेशुद्ध' होणे वेगळे…

जन्म लावा मानवाचा सार्थकी
गांडुळाचा जन्म येणे वेगळे…
  (कवी डॉ. अमेय गोखले)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐