#बुधवार,
मार्गशीर्ष कृष्ण ||१२|| शिवसंवत-३४२.
#राष्ट्रीय_कालगणना-
भारतीय सौर दिनांक-१६पौष,शके-१९३७
#दि.६जानेवारी,२०१६
अध्याय पहिला--
१४९
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥
वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥
उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥
एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥
________#श्रीतुकाराम_बोल्होबा_आंबिले
~~दररोज टेकवू माथा....!!
.....हररोज विचारांची "तुकाराम-गाथा"!!
अर्थ :- बायानो, या. आपण सार्याजणी जाऊ आणि वृंदावनी काल्याचा सोहळा पाहू ।।१।।
भगवान् श्रीकृष्ण बासरी वाजवित आहे. त्या वेणुनादामुळे जाण्यासाठी मन आतुर झाले आहे. हा विलंब माला सहन होत नाही ।।ध्रु।।
संसारातील काम राहीले असतील तर राहुद्यात. त्यात अडकून राहु नाका; कारण मानवी आयुष्यातील श्रीकृष्णभेटीची हीच वेळ आहे, मला याची खत्री आहे ।।२।।
भगवान् श्रीकृष्णचे रूप बघुन डोळे निवतील. घरची अडचणी आणणारी कामे तशीच सोसु ।।३।।
कृष्णभेटिच्या आड़ आलेले काहीही, कोणीही मला सहन होत नाही. लोक मर्यादा पाळावि हे जरी खरे असले, तरि मला ते मान्य नाही. संसाराविषयी माझे मन उदास झाले आहे. त्याला काय करावे ? ।।४।।
तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका एकमेकिंना वृंदावानात येण्यासाठी सूचना देत जात आहेत; कारण भगवंतांनी आपल्या सुंदर, सुकुमार रूपाने त्यांना तद्रूप करुन टाकले आहे ।।५।।.
सतत नियमित साडे बारा वर्षे सुरु राहणारा फेसबुक वरील एक 'अनोखा-अभंग-अखंड-साडे बारा वर्षे-श्री तुकाराम गाथा प्रसार-आध्यात्मिक उपक्रम'.
श्री तुकारामगाथा-एकूण ओवी संख्या=४५८३
४५८३/३६५=१२|| वर्षे
'एक तरी ओवी अनुभवावी।।'
यानुसार 'एक तरी ओवी अनुभवण्यास द्यावी' या उदात्त हेतूने प्रस्तुत उपक्रम कर्त्याने हा उपक्रम आषाढी एकादशी(जुलै,2015) पासून हाती घेतला आहे. ओवीच्या क्रमांकावरून आपल्याला उपक्रमाचा कितवा दिवस हे लक्षात येईल.
तर अनुभवू या,वाचू या अन आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.माऊली निश्चित्तच सर्वांना साथ देईल.
ता.क.-वाचू या,सांगू या आणि आचरणात आणून प्रसार करु या...!!
#सोशल_मीडिया विधायक बनवूया...!
या मध्ये उपक्रम कर्त्याचा कोणताही #स्व-अर्थ नाही.
_______श्री विशाल आनंदराव हारगुले.
No comments:
Post a Comment