Thursday 7 January 2016

शब्दांचा वाक्यात उपयोग

🚩मराठी पंधरवडा - सातवा दिवस🚩
 ➖➖➖➖➖➖➖➖➖

नमस्कार ,

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, १ ते १५ जानेवारी २०१६ शासनाने मराठी पंधरवडा म्हणून जाहीर केला आहे. मराठी भाषा संवर्धन हे समुहाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक असल्याने, सर्व सदस्य आपल्या सर्व उपक्रमांत हिरीरीने सहभागी होत आहेत त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏

कालच्या उपक्रमातील कथाकथन , वाचन आणि कथा आपल्या ब्लॉगवरून प्रसारीत करण्यात आली असून जर आपली कथा अथवा वाचन त्यात समाविष्ट नसेल तर कृपया आमच्या लक्षात आणून द्या.

आपल्या ब्लॉग चा दुवा -   http://marathichagaurav.blogspot.in/


〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 
#पुढे दिलेल्या शब्दांचा दिलेल्या शब्दाचा योग्य प्रकारे वाक्यात उपयोग करून ती वाक्ये समूहातच टाकावी. निवडक वाक्यांचे संकलन करून ती ब्लॉगवर प्रसिद्ध केली जातील.

१) मनोनीत = मनपसंत
२) दुर्लक्ष्य = दिसण्यास कठीण
३) चतुरस्र = चार बाजूंचे अवधान ठेवणारा
४) विमर्श = विवेक किंवा सखोल विचार
५) वल्कल = झाडाच्या सालीची वस्त्रे
६) धरवर = विश्वासाने ठेवलेली ठेव
७) ललाम = भूषण
८) बिचवा = खंबीर
९) चतुष्टय = चार जणांचा समूह
१०) वऱ्हाड = नवरदेवाकडची मंडळी

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

चला तर सर्व जण या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन मायमराठीचे आशीर्वाद घेऊ या !


            मराठीचा कराल जप,
          तर वाढेल मराठीचा खप....


              ||ज्ञानभाषा मराठी||
     ||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment