Wednesday 6 January 2016

तुकाराम गाथा

#गुरुवार, मार्गशीर्ष कृष्ण ||१३|| शिवसंवत-३४२. #राष्ट्रीय_कालगणना- भारतीय सौर दिनांक-१७पौष,शके-१९३७ #दि.07जानेवारी,2016. अध्याय पहिला-- फुगड्या - अभंग २ १५० फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥ त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥ आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥ तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥ ________#श्रीतुकाराम_बोल्होबा_आंबिले ~~दररोज टेकवू माथा....!! .....हररोज विचारांची "तुकाराम-गाथा"!!


अर्थ :- संसाराची फुगड़ी खेळतांना (प्रापंचिक क्रिया) मोकळी, मुक्त रहा. सर्व लाज सोडून एकांतात एकालाच पहा ।।१।। अगं, सर्व संसाराची फुगड़ी 'फु' करून मोडून टाक. तू जर संसार तोडुन टाकला तर खेळात खरी गोडी आहे ।।ध्रु।। मातेच्या पोटात असताना जे काही शिकलिस, ते आठव, त्यचा उच्चार कर ।।२।। तुझ्या पाठीवर त्रिगुणवृत्तिचि वेणी उड़त आहे. तिला सावरुं धर. मुलबंधाजवळ तिची गाठ बांध ।।३।। पुढे पायल टाकत एक- एक भूमिका जिंकू घे, म्हणजे तेथे तुला मान मिळेल. तिन्ही लोकांत तुला मान मिळेल. ।।४।। तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या-माझ्यात एकच भाव आहे, अशा सम स्थितीमध्ये आपण उच्च पोहचु ।।५।।
सतत नियमित साडे बारा वर्षे सुरु राहणारा फेसबुक वरील एक 'अनोखा-अभंग-अखंड-साडे बारा वर्षे-श्री तुकाराम गाथा प्रसार-आध्यात्मिक उपक्रम'. श्री तुकारामगाथा-एकूण ओवी संख्या=४५८३ ४५८३/३६५=१२|| वर्षे 'एक तरी ओवी अनुभवावी।।' यानुसार 'एक तरी ओवी अनुभवण्यास द्यावी' या उदात्त हेतूने प्रस्तुत उपक्रम कर्त्याने हा उपक्रम आषाढी एकादशी(जुलै,2015) पासून हाती घेतला आहे. ओवीच्या क्रमांकावरून आपल्याला उपक्रमाचा कितवा दिवस हे लक्षात येईल. तर अनुभवू या,वाचू या अन आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.माऊली निश्चित्तच सर्वांना साथ देईल. ता.क.-वाचू या,सांगू या आणि आचरणात आणून प्रसार करु या...!! #सोशल_मीडिया विधायक बनवूया...! या मध्ये उपक्रम कर्त्याचा कोणताही #स्व-अर्थ नाही. _______श्री विशाल आनंदराव हारगुले.

No comments:

Post a Comment