Thursday 7 January 2016

तुकाराम गाथा

#सुप्रभात.....!! #शुक्रवार, मार्गशीर्ष कृष्ण ||१४|| शिवसंवत-३४२. #राष्ट्रीय_कालगणना- भारतीय सौर दिनांक-१८पौष,शके-१९३७ #दि.08जानेवारी,2016. अध्याय पहिला-- फुगड्या - अभंग २ १५१ फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥ सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥ तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥ ________#श्रीतुकाराम_बोल्होबा_आंबिले ~~दररोज टेकवू माथा....!! .....हररोज विचारांची "तुकाराम-गाथा"!!

अर्थ :- सखे - फुगड़ी - फु मला विरोध करणारी तू, माझी सवत आहेस; कारण तुला प्रपंच्याची आवड आहे. विक्षेप, आवरण या मलाने तुझे डुंगन भरले आहे, ते धुवून टाक; नाहीतर तुझ्या तोंडावर थू:! ।।१।। माझ्याशी फुगड़ी खेळताना तुला हार खावि लागली, म्हणून जगाशि संबंध ठेवणारि स्री, येथून उठून जा ।।ध्रु।। प्रपंच्याची फुगड़ी खेळशील तर म्हातारपणी तुझे हात पाय थकतिल. तय प्रपंच्यात मनरूपी नलिन ढुंगन घोळत बसशील आणि तुझ्या ढुंगानाला कामक्रोधाची माती लागेल ।।2।। हे पोरी, अंग, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रीय, मन, बूद्धि या पाच सातांना जिंकल्याशिवाय तू माझ्याबरोबर परमार्थाच्या फुगड़ित कसा टिकाव धरणार आहे ? ।।३।। प्रपंच्याची फुगड़ी खेळतांना तुझा दम संपला आहे. पाय लुळ-पांगले झाले आहे. तुझी ही अशी वाइट अवस्ता झाली आहे. हे मलिन मनरूपी ढुंगन पुन्ह: पुन्हा का घोळत बसला आहेस. ? ।।४।। तुकाराम महाराज म्हणतात, ए गधड़े, अंग, अतातरि सांगीतल्या प्रमाणे कर. जागी हो ! ।।५।। सतत नियमित साडे बारा वर्षे सुरु राहणारा फेसबुक वरील एक 'अनोखा-अभंग-अखंड-साडे बारा वर्षे-श्री तुकाराम गाथा प्रसार-आध्यात्मिक उपक्रम'. श्री तुकारामगाथा-एकूण ओवी संख्या=४५८३ ४५८३/३६५=१२|| वर्षे 'एक तरी ओवी अनुभवावी।।' यानुसार 'एक तरी ओवी अनुभवण्यास द्यावी' या उदात्त हेतूने प्रस्तुत उपक्रम कर्त्याने हा उपक्रम आषाढी एकादशी(जुलै,2015) पासून हाती घेतला आहे. ओवीच्या क्रमांकावरून आपल्याला उपक्रमाचा कितवा दिवस हे लक्षात येईल. तर अनुभवू या,वाचू या अन आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.माऊली निश्चित्तच सर्वांना साथ देईल. ता.क.-वाचू या,सांगू या आणि आचरणात आणून प्रसार करु या...!! #सोशल_मीडिया विधायक बनवूया...! या मध्ये उपक्रम कर्त्याचा कोणताही #स्व-अर्थ नाही. _______श्री विशाल आनंदराव हारगुले.

No comments:

Post a Comment